डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन सेमिनार
कसबा बावडा – अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठीचा फॉर्म भरताना ऑप्शनची निवड अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. आपल्या या निर्णयावरच अभियांत्रिकी क्षेत्रातील आपल्या प्रवासाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे ऑप्शन फॉर्म अत्यंत विचारपूर्वक भरावा असे आवाहन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी ‘कॅप’ ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत आयोजित मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये डॉ. गुप्ता बोलत होते.
यावेळी डॉ. गुप्ता यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) कशा प्रकारे राबवली जाईल, मेरीट लिस्ट कशी वाचावी, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, महविद्यालयाला प्राधान्य द्यावे कि आवडत्या शाखेला, कॅपच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीसाठीच्या ऑप्शनचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, अलॉटमेन्टचे टप्पे व नियम, फ्रीज नॉट फ्रीज म्हणजे नेमके काय, स्वयं पडताळणीची प्रक्रिया, सीट अॅक्सेप्टन्स टप्पा, अग्रगण्य महाविद्यालयाची कट ऑफ लिस्ट, ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका आदी मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची आहे. आपली मेहनत, बुद्धिमता, ज्ञान आणि क्रिएटीव्हीटी याच्या जोरावर कोणत्याही शाखेत यशस्वी होता येते. यावर्षीची अभियांत्रिकी प्रक्रिया थोडी कठीण आहे. राज्यभरात अभियांत्रिकीसाठी सुमारे १ लाख ३० हजार जागा उपलब्ध असून त्यासाठी १ लाख ४७ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. बहुसंख्य विद्यार्थ्यंची संगणक शाखा मिळावी अशी इश्चा आहे. मात्र संगणक सबंधित शाखेच्या सुमारे ४९ हजारचा जागा आहत. त्यामुळे आपल्याला मिळालेले गुण व क्षमता या दोन्ही गोष्टीचा विचार करून हा ऑप्शन निवडावा. राज्यात अभियांत्रिकीची ५२ स्वायत्त महविद्यालये आहेत. या महाविद्यालयांना राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे ६ महिने इंटर्नशिप करता येणार असून त्यातून प्लेसमेंटची संधी वाढणार आहे. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयाना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालये आणि शाखा याबातची निवड करण्यासाठी आपल्याला किमान १ व जास्तीत जास्त ३०० पर्याय निवडता येतात. यातील पहिला ऑप्शन हा अनिवार्य आहे. विविध महाविद्यालयांची कट ऑफ लिस्ट पाहून ऑप्शनची निवड करावी. कन्फर्म करण्यापूर्वी जाणकार व्यक्तीकडून तपासून घ्या. प्रेफरन्स निश्चित केल्यानंतर पासवर्ड व ओटीपी वापरून अर्ज कन्फर्म करावा असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. |
या चुका टाळा
फक्त हाय कट ऑफची कॉलेज निवडणे, ठराविकच शाखा निवडणे, मित्रांनी भरलेले ऑप्शन कॉपी करणे, पहिल्या ऑप्शनची निवड विचारपूर्वक न करणे, कॅफे चालकावर विसंबून राहणे, कोणतीही माहिती न घेता-पूर्वतयारी न करता फॉर्म भरणे, खात्री केल्याशिवायच सबमिट करणे अशा प्रकारच्या चुका विद्यार्थ्यांनी टाळाव्यात असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले.
यावेळी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या विविध शंकांचेही डॉ. गुप्ता यांनी निरसन केले. या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, प्रा. रविंद्र बेन्नी यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.