वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे – राहुल रेखावार

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

जिल्हा मराठी भाषा समितीच्यावतीने वाचन प्रेरणा दिन…

कोल्हापूर – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्यासाठी येथील जिल्हा मराठी भाषा समितीच्यावतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कमला कॉलेज, राजाराम रोड, कोल्हापूर येथे व्याखानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा मराठी भाषा समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, अपर्णा वाईकर व इतर समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.