साहित्यिक व कवि वसंत पाटील संपादक असलेल्या पद्मरत्न दिवाळी अंकास प्रथम पुरस्कार
शिराळा (जी.जी.पाटील)
” कल्याण सार्वजनिक वाचनालायचा पद्मरत्न दीपावली अंकास २०२२ चा प्रथम क्रमांक पुरस्कार जाहीर झाला असल्याचे पत्र कल्याण वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी वसंत पाटील व दादासाहेब जगदाळे यांना दिले आहे.
१५७ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण सार्वजनिक वाचनालयाने राज्यातून स्पर्धेसाठी दिवाळी अंक मागविले होते. यामधून प्रथम तीन क्रमांक,दोन उत्तजनार्थ व दोन विशेष क्रमांक काढले आहेत. पद्मरत्न दिवाळी अंकास प्रथम कमांकाचे ३०००रु, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप असून २६ जानेवारी २०२३रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते वितरण होणार आहे गेल्या तीन वर्षा पासून कोल्हापूर इचलकरंजी येथून पद्मरत्न दिवाळी प्रकाशित होत आहे. मान्यवरसह नव्या पिढीतील कसदार लेखन असणारे साहित्यिक यांचे लेख, कथा, कविता, बालसाहित्य, स्वागत नवीन पुस्तकांचे,विडंबन आणि मार्मिक विनोदी किस्से यासह समर्पक उत्कृष्ठ मुखपृष्ठ असा असणारा दीपावली अंक जानकारांसह अल्पवधीत वाचकास पसंतीस उतरला आहे.मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन आणि संवर्धन करणे. वाचन चळवळ वाढविणे. यात छोटा सहभाग याचे समाधान आहे. सपांदक मंडळ, सर्व साहित्यिक,मार्गदर्शक या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.