सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं केला आनंदोउत्सव साजरा
कोल्हापूर : वार्ताहर
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान केल्यानंतर राज्यभरात कोशारी यांच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली होती, यानंतर राज्यपाल कोशारी यांनी मला पदमुक्त करा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली होती, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. आता रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवल्यानंतर कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र जमत आनंदोउत्सव साजरा केला. यावेळी महापुरुषांच्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणावून गेला, कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा हा विजय असल्याचे यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. याप्रसंगी बबनराव राणगे, डी. जी. भास्कर, बाळासाहेब देसाई कादरभाई मलबारी, अशोक पोवार, अभिषेक मिटारी, सुभाष देसाई, आर के पवार, शैलजा भोसले, शोभा खेडकर, अंजली जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते