WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

लोककलांचे जतन व संवर्धन गरजेचे – ज्येष्ठ शिवशाहीर राजू राऊत

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विधीनाट्य महोत्सवाला कोल्हापूरकरांची भरभरुन दाद… नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर – महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा असून या वारशाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे आवाहन करुन राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देऊन त्या टिकवण्यात राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणारे विधिनाट्य सारखे महोत्सव महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी केले.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २४ ते २६ मार्च या कालावधीत देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात विधीनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ शाहीर राजू राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शाहीर अवधूत विभुते, नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, शाहीर आझाद नाईकवडी, शाहीर शहाजी माळी, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील विविध भागातील लोककलावंतांनी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले. किरण पाचंगे व सिद्धार्थ कांबळे संच, सोलापूर यांनी संबळ – हलगी जुगलबंदी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. वासूदेव जोशी समाज, धर्मेंद्र भोसले आरवडे, पंढरपूर यांनी वासुदेव गीते सादर केली. महर्षी राजारामबापू कदम कलासंच, परभणी यांनी गोंधळ सादर केला. महालक्ष्मी पोतराज महासंघ, पुणे (साजन लांगडे-अंकुश चव्हाण) यांनी पोतराज साकारला. तर शेखर भाऊ व हर्षल भाऊ परदेशी, सातारा यांनी आराधी भोपी मेळा सादर केला. यावेळी सादर केलेल्या संबळ – हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी आदी कलाप्रकारांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात व हात उंचावून भरभरुन दाद दिली. प्रशांत आयरेकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यामधील लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने लोककला महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना उर्जितवस्था प्राप्त होणे, त्यांचा वारसा टिकविणे, या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता वृध्दिंगत करण्यासाठी 24 ते 26 मार्च रोजी, दररोज सायंकाळी 6.30 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर या ठिकाणी विधीनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संबळ-हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी, डाकवादन व कहानी गायन, मादोळ, घांगळी वादन, डेरा वादन, थाळ वादन, किंगरी वादन, दिमडी-चोंडक जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारुड, वाघ्यामुरुळी,कडकलक्ष्मी, डकलवार किंगरी अशा लोककलांचे राज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे. या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.