महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव होगाडे यांचे सर्वत्र स्वागत…
धुळे (गोपाल के.मारवाडी) – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) या राज्याच्या वाणिज्य, उद्योग, कृषी-उद्योग आणि सेवा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था, संघटनात्मक निवडणुका आणि पदाधिकाऱ्यांच्या च्या तज्ञ समित्या नियुक्तीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. उल्लेखनीय आहे की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने आपल्या ऐतिहासिक टप्प्यांपैकी अत्यंत महत्त्वाचे असलेले शताब्दी वर्षही लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी’ समितीच्या अध्यक्षपदी वीजतज्ज्ञ प्रतापराव होगाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला विशेष आनंद होत आहे. असे नियुक्ती पत्रात अध्यक्ष ललितजी गांधी म्हटले आहे.
प्रतापराव होगाडे यांची गव्हर्निंग कौन्सिलमध्ये ‘पदसिद्ध सदस्य’ म्हणूनही निवड झाली आहे. ‘पॉवर टेरिफ इलेक्ट्रिसिटी’ समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कामांचा संक्षिप्त अजेंडाही स्वतंत्रपणे तयार करण्यात येत आहे. यामध्ये व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कृष्णा परब हे या समितीचे मूलभूत मार्गदर्शक अधिकारी असतील आणि ते समितीच्या इतर सदस्यांना मार्गदर्शन करतील. सभासदांच्या नियमित बैठकांमधून उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी संघटनेला अपेक्षित आहे. ‘पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी’ समितीचे ‘अध्यक्ष’ म्हणून, गव्हर्निंग कौन्सिलचे ‘पदसिद्ध सदस्य’ म्हणून, तुम्ही गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून इतर कर्तव्ये पार पाडू शकाल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष श्री ललितजी गांधींनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीपत्रावर अध्यक्ष ललित गांधी यांची स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना ही नोंदणीकृत संस्था असून तिचे संस्थापक अध्यक्ष, राज्यातील जेष्ठ वीज तज्ज्ञ प्रतापराव होगाडे हे वीज नियामक आयोगासमोर ग्राहकांची बाजू मांडतात. यामुळे आयोगाकडून अतिशय विचारपूर्वक आणि ग्राहकाभिमुख निर्णय घेण्यास बाध्य होते. होगाडेंच्या आर्ग्युमेंट मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांनाही कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो आहे. नुकतेच प्रीपेड मीटरच्या मुद्द्यावरून मुंबई, इचलकरंजी, कोल्हापूर, भिवंडी आदी ठिकाणी संस्थेमार्फत राज्य सरकारला नोटीस पाठवून त्याविरोधात जोरदार आवाज उठवला गेला, त्यामुळे या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्यात आली.
राज्यभरात ते बसविण्याचा प्रश्न सध्या तरी स्थगित करण्यात आला आहे. प्रतापराव होगाडे यांच्याकडे समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. त्यांच्या नियुक्तीचे धुळे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे नेते सर्वश्री प्रो. शाम पाटील, माजी आमदार प्रो. शरद पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे प्रदेश उपाध्यक्ष व धुळ्याचे प्रसिद्ध उद्योगपती श्री नितिनजी बंग,उद्योजक भरतसेठ अग्रवाल, वर्धमान सिंघवी, कोल्हापूरचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शेखरभाऊ धोंडगे, विनायकराव जितकर तसेच शिरपुर तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार गोपाल के. मारवाडी, मोहन साहेबराव पाटील, हेमंतभाऊ पाटील,संजयभाऊ आसापुरे, कैलासभाऊ धाकड , डॉ सरोजताई पाटील, ॲड. हिरालाल परदेशी, ॲड. गोपालसिंह राजपूत, ॲड. संतोष पाटील, शिवाजीराव बोरसे पाटील, पिंटूभाऊ राजपूत (आमोदे), युवराज माळी,ओंकार आबा जाधव यांच्यासह सर्व कार्यकारिणीने स्वागत केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.