मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर
गारगोटी प्रतिनिधी – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली असून या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता मिळून 3 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा देखील झाले आहेत परंतू अनेक महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झालेले नसून या महिलांनी आधार कार्ड सिडिंग करून घ्यावे असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. ते पंचायत समिती भुदरगड येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राधागनरी तालुक्यातील 52 हजारहुन अधिक अधिक महिलांनी अर्ज केला असून 50 हजार 192 इतक्या महिला पात्र ठरल्या आहेत. तसेच भुदरगड तालुक्यातून 37 हजारहून अधिक महिलांनी अर्ज केला असून 36 हजार 964 इतक्या महिला पात्र ठरल्या असून आहेत. योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतू अनेक महिलांचे बँक खाते ‘आधार सिडिंग’ नसल्यामुळे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत परंतू त्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांनी तात्काळ बँक खाते ‘आधार सिडिंग’ करून घ्यावे जेणेकरून सदर महिलांना या योजने 3 हप्ते मिळणे सोईचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर, तालुका संघाचे संचालक मानसिंग पाटील, संजयगांधी समिती सदस्य के. पी. जाधव, नारायण वरंडेकर, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, जयसिंग मांगले, कक्ष अधिकारी कांचन भोईटे, महिला बालकल्याण अधिकारी शितल पाटील, बांधकाम उपअभियंता डी.व्ही.कुंभार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्धन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.