भगवान परशुराम जन्माेत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

 

इचलकरंजी/- इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने यंदाही पारंपारिक पध्दतीने भगवान परशुराम जन्माेत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवार 19 व साेमवार 20 एप्रिल राेजी विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. रविवार 19 राेजी श्री भगवान परशुराम यांचा जन्माेत्सव असून सकाळी 8 ते 10 श्री पुजा व पवनाम अभिषेक तर त्याचबराेबर सायंकाळी 5.30 वाजता किर्तन, जन्मकाळ व हळदी-कुंकू असे कार्यक्रम धाकटा वाडा काेर्टाशेजारी येथे हाेणार आहे. तर सकाळी 10.30 वाजता टाकवडे राेडवरील डेक्कन इंग्लिश स्कुल शेजारी परशुराम भवन नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते हाेणार आहे. साेमवार 20 राेजी सायंकाळी 5 वाजता भगवान परशुराम यांची भव्य शाेभायात्रा काढण्यात येणार आहे.

या शाेभायात्रेचा शुभारंभ गावभागातील नरसाेबा कट्टा येथून हाेईल. तर राम मंदिर येथे सांगता हाेईल. या सर्व कार्यक्रमात समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.