प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी थंड पाणी…
कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथे आज पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि त्यांना थंड पाणी मिळावे यासाठी कोल्हापूर येथील अग्रणारी प्रांतीय महिला असोसिएशन संचलित महाराष्ट्र राज्य जिल्हा कोल्हापूर राजस्थानी महिला मंडळ यांच्या वतीने ही पानपोई ची सुविधा देण्यात आली.
या पाणपोईचे उद्घाटन श्री. लक्ष्मीनारायण मंदिर चे सदस्य अशोक अग्रवाल आणि राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष सुजाता गोयल यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव सीमा उदयापुरी, स्टेशन मास्तर विजयकुमार, रेल्वे बोर्ड सदस्य शिवनाथ बियाणी, मुख्य पार्सल पर्यवेक्षक लीलाधर मेश्राम यांच्यासह अन्य रेल्वे कर्मचारी आणि राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होते.
यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व प्रवाशांना बारा महिने 24 तास थंड पाणी कसे मिळेल, यासाठी सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने करावा.त्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन राजस्थानी महिला मंडळ सुजाता गोयल आणि लक्ष्मीनारायण चे सदस्य अशोक अग्रवाल यांनी दिले.