शित्तूर – वारुण (तालुका – शाहूवाडी) उदगिरी येथील काळाम्मा देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रतीवर्षी प्रमाणे सन 2023 मधेही
ओंकार होंडा सर्व्हिस शेडगेवाडी फाटा आणि टू व्हिलर गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिक्स असोसिएशन कराड यांच्यामार्फत यात्रेदिवशी दि.07 मार्च 2023 रोजी श्री क्षेत्र उदगिरी येथे टु – व्हिलर फ्री सर्व्हीस कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
उदागिरी हे गावं आरळा आणि मलकापूर या मुख्य रस्ता मार्गांपासून 20-25 किलोमीटर लांब डोंगरावर दुर्गम अशा ठिकाणी असल्यामुळे लांबून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची टू व्हिलर ला जर एखादा प्राॅब्लेम आला , बंद पडली किंवा पंक्चर झाली तर फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.म्हणून त्यांची गैरसोय टाळण्यासाठी कराड असोसिएशन गेली 15 वर्षे या ठिकाणी यात्रेनिमीत्त फ्री सर्व्हीस कॅम्प चे नियोजन करून एक प्रकारची भाविकांची सेवा करीत आहे. या कैप साठी कराड असोसिएशन तर्फे 25 मेकॅनिकांची टीम हजर होती .तसेच आज जवळपास 70 ते 75 गांड्याची कामे मोफत स्वरूपात करण्यात आली. व त्यामुळे भाविकांची सेवा करण्यास कराड असोसिएशन च्या मेकॅनिक बंधूना संधी मिळाली. हा फ्री सर्व्हीस कैप यशस्वी करण्यासाठी कराड असोसिएशन चे अध्यक्ष श्री.चंद्रकांत खिलारे, सचिव श्री. विवेक शिंदे, श्री. आनंदराव पाटील, माणिक खटावकर, अनिल पाटील, प्रमोद बाबर, श्रीधर पाटील, युवराज डुबल, दिपक सूर्यवंशी, राम शेवाळे, राजेन्द्र सरकाळे, अजित देसाई, एकनाथ कुंभार, शाहरूख मुल्ला, धोंडीराम ठाकर, सूर्यकांत गोंदील संदीप नाटूलकर तानाजी शेडगे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होतं असून ज्यांना मदत झाली त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले.