आरक्षण न दिल्यास सरकारचे काही खरे नाही मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा शासनाला इशारा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
हिंगाेली:- (बाबूराव ढोकणे ) मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देईल, अशी सरकारकडून अपेक्षा मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात करण्यात आली ,तसे झाले नाही तर सरकारचे काही खरे नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी गुरुवारी हिंगोली येथील ७/१२ च्या महासभेत दिला.

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे फाट्यावर मराठा आरक्षणा संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जरांगे पुढे म्हणाले , मराठा समाजातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहेत. आता ती वेळ जवळ आली आहे. समजाने सुरू केलेल्या आंदोलनाकडे लक्ष देत सरकारने आरक्षणाची कारवाई सुरू केली आहे. आता सरकारने आरक्षण जाहीर करण्यासाठी २४ डिसेंबरची सरकारला डेडलाईन दिली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील ऐका… सविस्तर भाषण

सरकारने कोणत्याही परिस्थितीत २४ तारखेपर्यंत आरक्षण जाहीर करणे आवश्यक आहे. सरकारला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता मुदतवाढ देण्याची गरज नाही. यावेळीही सरकारने धमकावण्याचा प्रयत्न केला तर ती चांगली गोष्ट नसल्याचे जरांगे म्हणाले .

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.