WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

एनएसएसमुळे जमिनीशी नाळ आणखी घट्ट होईल – प्रा. प्रमोद पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात…

कोल्हापूर – एन.एस.एस मुळे विद्यार्थ्यांमधील सेवावृत्ती अधिक वृद्धिंगत होईल. समाजाप्रती जबाबदारीची भावना वाढीस लागेल. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जमिनीशी असेलेले नाते अधिक मजबूत बनण्यास मदत होईल असा विश्वास ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते विलासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभात प्रा. पाटील बोलत होते.

वळीवडे (ता. करवीर) येथे ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत एन.एस.एसच्या पाच दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या काळात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, सामुदायिक सेवा प्रकल्प, महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, स्किट सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, चित्रकला, योग ध्यान, संगणक साक्षरता, हस्तलेखन, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, रांगोळी आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन प्रा. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ. अद्वैत राठोड, संचालक (स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट) डॉ. अजित पाटील, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, सरपंच रूपाली रणजीतसिंह कुसाळे, उपसरपंच वैजनाथ अशोककुमार गुरव, ग्रामसेवक महेश बाबुराव खाडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले.

प्रा. पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे उत्तम सामाजिक संस्कार घडतात. विद्यार्थी आपल्या क्षेत्रात उत्तम अभ्यास, संशोधन करून नक्कीच यश मिळवतील. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आकाश मोकळे आहे. पण कितीही मोठे झाला तरी पाय नेहमीच जमिनीवर राहिले पाहिजेत. हाच संदेश या शिबिरातून मिळेल याची खात्री आहे. कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा देईल. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले, या शिबिरानंतर विद्यार्थ्यांना नक्कीच सकारत्मक बदल जाणवेल. डॉ. अजित पाटील म्हणाले, विद्यार्थ्यानी नेहमी समाजात वावरले पाहिजे. त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग सामाजासाठी केला पाहिजे. डॉ. अद्वैत राठोड म्हणाले, एन.एस.एस आणि श्रमसंस्कार शिबिरांमुळे समाजसेवेची अधिक आवड निर्माण होईल. सरपंच रूपाली कुसाळे म्हणल्या, आपण समाजाचे देणे लागतो हि भावना नेहमी ठेवावी. समाजासाठी जे काही चांगले करता येईल यासाठी नेहमी पुढाकार घ्यावा.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रकल्प अधिकारी सौ. रेणुका तुरंबेकर व सह प्रकल्प अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पेटारे तसेच डी वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. निखील नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. अक्षय भोसले, रोहन बुचडे यांनी परिश्रम घेतले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.