शिराळा (जी.जी.पाटील)
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड…
शिराळा – हाय्यर एज्युकेशन सोसायटी, शिराळा संचलित आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु. निलेश शामराव धामणकर याने जिल्हास्तरीय ५००० मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन सांगली यांच्या वतीने जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेतील ५००० मी. धावणे प्रकारात निलेश धामणकर याने प्रथम क्रमांक मिळविला. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे २१ मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धेसाठी त्याची जिल्हा संघामध्ये निवड झाली आहे.
निलेश डोंगरी, जंगल भागातील विद्यार्थी असुन त्याच्या या यशाबददल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशासाठी त्याला मुख्याध्यापक ए. एस. घोरपडे, पर्यवेक्षक आर. डी. देसाई असोसिएशनचे सचिव संजय पाटील, प्रा. डॉ. गणेश सिंहासने तसेच शिक्षण संस्थेचे पदाधिकारी याचे मार्गदर्शन लाभले. तर क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.