महाराणी ताराराणी सभागृहामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा…
कोल्हापूर – राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन भारतात दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो त्याचे औचित साधून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अल्पसंख्यांक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या शुभ संदेशांमध्ये अल्पसंख्यांक दिनाच्या निमित्त सर्व समुदायाने एकत्रित येऊन मूलभूत प्रश्नांवर विचार विनिमय होण्याची गरज असल्याचे सांगितले.
शिक्षण रोजगार आरोग्य व्यवसाय प्रशिक्षण इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर विचार मांडण्याबाबत सूचित केले. लोकजागृती झाली तरच अल्पसंख्याकांचे प्रश्न कमी होतील समाजाची उन्नती होईल असा शुभ संदेश त्यांनी दिला. शासकीय योजनांची माहिती करून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तसेच वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. शिक्षणापासून वंचित राहू नये असेही त्यांनी आवाहन केले. प्रत्येक घरी वृत्तपत्राचे वाचन व्हावे व समाज सुधारण्यासाठी माहिती अवगत करावी आपल्या देशाचे आपण सर्व एक नागरिक आहोत आपले अधिकार व हक्कांचे माहिती करून घ्यावी. शासन कायम आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. या दिनाच्या निमित्त अनेक शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन झाडाच्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये अल्पसंख्यांकांच्या समुदायाशी संबंधित परिसंवाद त्यांचे हक्क त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच भारतीय राज्यघटनेमध्ये या समाजातील समुदायाचे हक्काचे संरक्षण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लीडकाम बँकेचे गोडसे यांनी बँकेच्या विशेष योजना याबाबत तर मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांनी शैक्षणिक कर्ज व इतर उद्योग कर्जाबाबत शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच मुनाफ मनेर यांनी अल्पसंख्याकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये अनेक संघटनांनी आपली निवेदने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करून अल्पसंख्याकांना न्याय द्यावा याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांकांना येणाऱ्या अडचणी बाबत आपले विचार व्यक्त केले व शासनाने आमच्या पाठीशी उभे राहावे तरच हा समुदाय प्रगतीच्या दिशेला जाईल असे प्रतिपादन केले. तसेच अल्पसंख्यांक जिल्हास्तरीय कमिटी स्थापन व्हावी अशी ही मागणी केली.
Loading ...
विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच अनेक योजना देऊन शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना स्थान देण्यात यावे असेही संघटना कार्यकर्त्यांनी सांगितले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी शिक्षण अनुराधा म्हेत्रे, डेप्युटी कलेक्टर विवेक काळे, तहसीलदार स्वप्निल पवार, एडवोकेट मुनाफ मनेर, मौलाना आझाद महामंडळाचे प्रमुख उदय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश गडकरी, गणी आजरेकर, दस्तगीर मुलानी, पीटर डिसोजा, मुस्लिम बोर्डिंग चे पदाधिकारी ,कादर मलबारी ,साहिल जमादारतसेच समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन साळे, सचिन पाटील कार्यालय अधीक्षक, सर्व कर्मचारी, पदाधिकारी वार्ताहर व अल्पसंख्यांक संघटना प्रमुख व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याण विभागाच्या समता दूत आशा रावण यांनी केले तर आभार उदय कांबळे यांनी केले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.















































































