आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कसबा वाळवे गावात 21 कोटी 50 लाख विकास निधी… गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ…

कसबा वाळवे – राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा व गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानी माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती वंदना अरुण जाधव होत्या. कार्यक्रमाचे स्वागत गावच्या लोकनियुक्त सरपंच वनिता पाटील यांनी केले. व गावातील विकास कामांची माहिती दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत चांगली झाली आहे. त्याचं बरोबर या पंचक्रोशीतील येणाऱ्या रुग्णांना आरोग्याच्या सेवा देण्याचे काम तात्परतेने केले पाहिजे. आरोग्य सेवेमध्ये कोणतीही कमतरता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भविष्यात राखडलेल्या कसबा वाळवे ते चंद्रे पुलाच्या कामाची सुरवात लवकरच करण्यात येईल. तसेच कसबा वाळवे गावचे ग्रामदैवत मारुती मंदिराचा जीर्णोद्धार येत्या कळात चांगल्या प्रकारे केला जाईल अशी गाव्ही आमदार आबिटकर यांनी दिली. मला मिळालेला उत्कृष्ट संसंद पट्टू पुरस्कार हा माझ्या मतदार संघातील लोकांना समर्पित करतो. असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.

यावेळी माजी उपसभापती अरुणराव जाधव, अशोक फराकटे, मानसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केली. प्रस्ताविक निर्मला पाटील तर आभार सचिन पाटील यांनी मानले. यावेळी दत्तात्रय उगले, नंदकुमार ढेंगे, गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, राजेंद्र शेट्टे, शामराव भावके, राजू वाडेकर, टी.एच.ओ. देसाई, कुंडलिक पाटील, विश्वनाथ पाटील, विलास पाटील, दादासाहेब पाटील, रवी पाटील, सचिन वारके, अशोक वारके, विलास डवर, संजय पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.