स्वहित साधणाऱ्या माजी आ. के. पी. पाटील यांनी दहा वर्षात मतदारसंघासाठी काय केले…
सरवडे प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवावी व महायुती सरकारने गरीब पिडीत वयोवृद्ध व्यक्ती, महिला, युवक, दिव्यांग यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून त्याची मतदार संघात प्रभावी अमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले. ते नरतवडे (ता. राधानगरी) येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रंगराव मगदूम होते.
आमदार आबिटकर म्हणाले, स्वताच्या आमदारकीच्या काळात फक्त स्वहित साधणाऱ्या माजी आ. के. पी. पाटील यांनी दहा वर्षांत कोणती विकासकामे केली हे सिध्द करावे मगच आपल्यावर आरोप करावे. आम्ही मतदारसंघात विकासात्मक अजेंडा घेऊन काम केले असून मतदारसंघातील एकही गाव विकासापासून वंचित राहिले नाही. २०१४ पुर्वी मतदारसंघात विकास होण्यासाठी आम्हाला संघर्ष यात्रा काढावी लागली. आता आपण विकास पर्व सुरू झाले आहे. १ ऑगस्ट पासून मतदारसंघात विकास यात्रेचा प्रारंभ करणार आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणार आहे. आजरा आणि राधानगरी येथे औद्योगिक प्रकल्पांना चालना देऊन भविष्यात जनतेच्या हिताचे अनेक कल्याणकारी प्रकल्प कार्यान्वित करणार असून त्याचा शुभारंभ लवकरच करणार आहोत असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, रंगराव मगदूम, अशोकराव फराकटे, डी. पी. पाटील, एकनाथ चौगुले, नंदकिशोर सूर्यवंशी, तानाजी चौगुले, राजेश मोरे, संग्राम पाटील, ए. बी. पाटील, विजय बलुगडे, सुभाष चौगुले, सचिन वारके, सुभाष पाटील, कुंडल पाटील, सिताराम खाडे, शौकत बक्षु, विश्वास राऊत, के. के. राजगिरे, दिपक शेट्टी, अशोक वारके, अरविंद पाटील, विलास डवर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत नंदकुमार निर्मळे यांनी तर आभार विजय बलुगडे यांनी मानले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.