action modeआमदार अशाेकराव माने उतरले रस्त्यावर आणि प्रशासनाला धरले धारेवर

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त… आधी उपाययाेजना ठरवा… 

शिराेळ- (रुपेश आठवले)- हातकणंगले येथील मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा. लोकांची गैरसाेय टाळा, अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलितमित्र अशोकराव माने (बापूंनी) आज प्रशासनाला धारेवर धरूत थेट रस्त्यावर उतरून सर्वांचा पंचनामा केला. यावेळी नागरिक तसेच वाहनचालकांच्या समस्या जाणून घेत, प्रशासनातील अधिकारी वर्गाला सज्जड दम देत, यावर तातडीने कारवाई करा. लाेकांच्या गैरसाेयी टाळा अशा सूचना केल्या. 
सांगली -कोल्हापूर मार्गावर हातकणंगले बस स्थानक चौकात गेली अनेक दिवस ऊस वाहतूक सुरु आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दाे्न्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे. या सर्व बेशिस्त कारभाराचा नागरिक तसेच वाहनचालकांना नाहक त्रास हाेत आहे. त्यामुळे तक्रारी देखिल वाढल्या हाेत्या.  या सर्व प्रकरणाची दखल घेत, अखेर आमदार अशाेक माने यांनी अँक्शनमाेड येत , थेट भर रस्त्यातच प्रशासनाचा पंचनामा करीत, अधिकाऱ्यांना रस्त्यावरच बाेलावून घेतले. 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आमदार अशोकराव माने यांनी आज सकाळी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढा अशा सूचना दिल्या.  वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफीस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमीची अडथळा वाहतूक कशी दूर करता येईल, याबाबत विचारविनिमय केला.  यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण,पार्किंग शिस्त,हायमास्ट, डिव्हायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसांड थांबवावे अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, एनएचएआय चे अधिकारी महेश पाटोळे ,बांधकाम विभाग उपकार्यकरी अभियंता शिवाजी पाटील,तहसीलदार प्रतिनिधी फड सर, मुख्याधिकारी विशाल पाटील यांसह भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,नगरसेवक राजू इंगवले,स्वीय सहायक सुहास राजमाने,रमजान मुजावर,दीनानाथ मोरे,मयूर कोळी,उमेश सूर्यवंशी,मनोज इंगवले,गुंडू जाधव, प्रवीण कोळी,प्रकाश स्वामी यांसह हातकणंगले नगरी मधील प्रमुख नेते,कार्यकर्ते,नागरीक व पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते* 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.