WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गोकुळकडून दुग्धचैतन्य योजनेचा शुभारंभ…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

जातीवंत दुधाळ गाई – म्हैशींसाठी युथ डेव्हलपमेंट बँकेची “दुग्धचैतन्य” योजना…

गोकूळ शिरगाव – गोकूळचे संचालक डॉ. चेतन अरूण नरके यांच्या संकल्पनेतून दूध उत्पादन वाढीसाठी “दूग्धचैतन्य ” या अभिनव योजनेचा शुभारंभ गोकूळचे अध्यक्ष मा. अरूण डोंगळे यांच्या झाला. या योजनेतून दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने जातीवंत दूधाळ गायी – म्हैशी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी यूथ बॅकेकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तर ‘मु फॉर्म’ या समूहाच्या सहयोगाने राजस्थान पंजाब आणि हरियाणा येथील जातीवंत गायी, म्हैशी खात्रीशीरपणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

गोकूळचे अध्यक्ष मा. अरूण डोंगळे साहेब यांनी या योजनेचे कौतुक केले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली गोकूळच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजनेची सुरुवात होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले.गोकूळचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव पाटील चुयेकर यांचा संदर्भ देत त्यांनी दूध वाढीसाठी ही योजना महत्वाची असल्याचे सांगितले.जातीवंत दुधाळ जनावरे देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण ही देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. डॉ. चेतन अरुण नरके यांनी दूग्धचैतन्य योजनेचा हेतू आणि स्वरूप स्पष्ट केले. हरियाना , राजस्थान आणि पंजाब राज्यातील जातिवंत जनावरे आता कोल्हापुरात थेट उपलब्ध होणार आहेत. याकरिता आशियातील नामवंत कंपनी मु फार्म कोल्हापुरात जातिवंत दुधाळ जनावरांचा फार्म सुरु करत आहे. यामुळे दूध उत्पादकांचे श्रम, वेळ आणि पैसे वाचणार आहेत. याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

दूध उत्पादनात अग्रेसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. बदलत्या काळानुसार या व्यवसायाचे स्वरूप देखील बदलत आहे. नव्या पिढीतील दूध उत्पादक दुग्ध व्यवसाय हा आधुनिक आणि व्यवसायिक पद्धतीने करताना दिसत आहेत. फायदेशीर दूध उत्पादनासाठी गाय आणि म्हशीच्या चांगल्या वाणाची गरज असते. अधिक दूध देणारे आणि वर्षातील जास्तीत जास्त दिवस दूध देणाऱ्या वाणाची निवड करणे आणि असे खात्रीशीर जातिवंत जनावर उपलब्ध करणे हे आजच्या दूध उत्पादकांसमोरील मोठे आव्हान आहे. दूध उत्पादकाला जातिवंत गाय आणि म्हैस खरेदीसाठी एजंट मार्फत हरियाना राजस्थान आणि पंजाब या राज्यात चांगला फार्म शोधावा लागतो. त्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसे खर्च होतात. जनावराची किंमत ठरवण्याचे निकष देखील स्पष्ट आणि पारदर्शक नसतात. विकत घेतलेले जनावर जातिवंत आहे याची हमी दिली जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा दूध उत्पादकांची फसवणूक झाल्याचा देखील अनुभव आहे.

परंतु आता मु फार्म च्या माध्यमातून हि सर्व प्रक्रिया सोपी सुलभ आणि किफायतशीर आणि खात्रीशीर होणार आहे. मु फार्म मध्ये विविध निकषांच्या आधारावर प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्रासह जनावरांचा पुरवठा केला जातो. पशुवैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ त्यांचा अनुभव आणि विविध शास्त्रीय निकषांच्या आधारे जातिवंत वाणाची निवड करतात. यामध्ये त्या जनावराची मागील पिढ्यांची उपलब्ध माहिती, आरोग्य तपासणी अहवाल, दूध देण्याची क्षमता अशा बाबींचा समावेश असतो. वैद्यकीय अहवाल आणि लसीकरण करूनच दूध उत्पादकांना जनावरे सोपवली जातात.

दूध उत्पादक अशा प्रमाणित केलेल्या असंख्य जनावरामधून आपल्याला आवडलेल्या जनावरांची दोन तीन दिवस स्वतः धार काढून जनावराच्या गुणवत्तेची खात्री करून मगच खरेदी करु शकतो. जनावरांची किंमत देखील विशेष निकषांवर ठरवली जाते. जनावर खरेदी नंतर दूध उत्पादकांना चांगल्या दर्जाची विक्री पश्चात सेवा दिली जाते. यामध्ये पशु संवर्धनाचे प्रशिक्षण, २४ तास ऑनलाईन वैद्यकीय सेवा, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन अशा बाबींचा समावेश आहे. यावेळी डेअरी फेस्टिव्हलमध्ये आयोजित लकी ड्रॉ विजेते जयसिंगपूर येथील शेतकरी विशाल पवार यांना प्रतिकात्मक स्वरूपात म्हैस प्रदान करण्यात आली.तसेच दूग्धचैतन्य या योजनेच्या माध्यमातून पहिल्या दोन शेतकऱ्यांचे चेक मू फार्म कंपनीच्या प्रतिनिधींनी कडे हस्तांतरित करण्यात आले.

यावेळी गोकूळचे माजी चेअरमन विश्वास पाटील(आबाजी), संचालक शशिकांत आनंदराव पाटील- चुयेकर,अजित नरके, किसन चौगुले, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव,बायजी शेळके, बाळासाहेब खाडे,बाबासो चौगले,युवराज पाटील,सौ. शोमिका महाडिक, श्रीमती अंजना रेडकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सोबत गोकुळचे कर्मचारी आणि दूध उत्पादक आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.