लाँग लाईफ मोती महल आरपीएलचा विजेता… एमडब्ल्यूजी सुपरकिंग्सज संघाला उपविजेतेपद…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सचिन गाडगीळ मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज तर राकेश घाणेकर उत्कृष्ट गोलंदाज

कोल्हापूर – लाँग लाईफ मोतीमहल संघाने आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले . तर एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघ उपविजेता ठरला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने मेरी वेदर मैदानावर प्रकाश झोतात ही स्पर्धा झाली. लॉंग लाइफ मोती महल संघाचा कर्णधार सचिन गाडगीळ मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर याच संघाचा राकेश घाणेकर उत्कृष्ट गोलंदाज ठरला.

अंतिम सामन्यात लॉंग लाइफ मोती महल संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांमध्ये १०१ धावा केल्या. कर्णधार सचिन गाडगीळने १५ चेंडूत चार षटकारांसह ३१ धावा तर सचिन परांजपे यांनी १२ धावा केल्या. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघाकडून डॉ. समीर कोतवाल, दर्शन सावंत यांनी प्रत्येकी दोन तर रवी मायदेव , रवी खोत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. प्रत्युत्तरा दाखल खेळताना एमडब्ल्यूजी सुपरकिंग्सचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत गेले. सचिन पाटील २६, कर्णधार नामदेव गुरव १४, प्रसन्न सरदेसाई ११ यांनी दुहेरी धावसंख्या उभारली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या संघाला निर्धारित १० षटकात ५७ अशी धावसंख्या उभा करता आली. लॉंग लाइफ मोतीमहल कडून राकेश घाणेकर दोन तर प्रवीण काजवे आणि आदर्श शेट्टी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील, क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को- चेअरमन प्राचार्य डॉ. महादेव नरके , रविराज शिंदे, संग्राम शेवरे, निलेश पाटील,दाजीबा पाटील,अभिजित भोसले,राजेश आडके,संजय कदम, अविनाश चिकनिस, संदीप साळोखे , डॉ.अभिजित माने यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.