विनायक जितकर
अरूण नरके फौंडेशनच्या वतीने, चला एक झाड लावुया उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद…
कोल्हापूर – पर्यावरण संवर्धनासाठी ‘चला एक झाड लावुया’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम अरूण नरके फौंडेशनचे वतीने राबविण्यात येत आहे. फौडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांच्या संकल्पनेतून, रंकाळा गार्डन येथे तुळशीच्या रोपांचे वाटप करून या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी डॉ. चेतन नरके यांनी प्रत्येकाने, किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
वारंवार येणारा महापूर, अनियमित पडणारा पाऊस, तापमानवाढ, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीचा सर्वांना सामना करावा लागतो. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हा कळीचा मुद्दा झाला आहे. निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यांचे मुख्य कारण हे, मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड आहे. जर आपण झाडे लावली नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होईल. किमान पुढील पिढीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. असे आवाहन अरूण नरके फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुढील दोन महिने या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई, निसर्ग प्रेमी कुशल ओसवाल, वृक्षप्रेमी ग्रूप अर्चना कुलकर्णी, गार्डनकल्बच्या राजेश्वरी पवार यांच्यासह, माॅर्निग वाॅकसाठी आलेले जेष्ठ नागरिक आणि अरूण नरके फौंडेशनचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |