WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. शाहू मिलमध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा द्या.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 निमित्त दिनांक 6 ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या विचार व कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजित कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व यंत्रणांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, उपायुक्त रविकांत अडसूळ तसेच महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, शिवाजी विद्यापीठ यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिलमध्ये होणाऱ्या सर्व उपक्रमांत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतर्गत विभाग, महिला बचतगट, विविध संस्था, संघटना, तरुण मंडळे, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी सहकुटुंब सहभागी होवून इतरांनाही यासाठी प्रेरित करावे. समाजातील सर्व घटकांसाठी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महत्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. या दिवशी कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमा दरम्यान वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी नियोजन करा, तसेच पोलीस बंदोबस्त द्यावा, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यावेळी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

ग्रामीण उद्योजकांना शहराला जोडण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने शाहू मिलमध्ये दिनांक 6 ते 14 मे दरम्यान विविध उपक्रमांबरोबरच कृषी, उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रांशी संबंधित जिल्ह्यातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. तसेच गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तु, घोंगडी, जान, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सव आयोजित केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारे, कोल्हापूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी दालने याठिकाणी असणार आहेत, सर्व स्टॉलवर दर्जेदार उत्पादने ठेवण्याचे नियोजन करा, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी दुपारच्या सत्रात माहितीपर मराठी व हिंदी चित्रपट तसेच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. सर्व दालनांना, स्टॉल्सला व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले. इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफी, पेपरक्राफ्ट, माती शिल्प, चित्ररेखांकन व रंगकाम, ॲनिमेशन आदी बाबत माहितीपर कार्यशाळा दररोज सकाळच्या सत्रात येथे घेण्यात येणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

शाहू मिल परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मिलच्या मागील भागाचाही पार्कींगसाठी वापर करा. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा. विद्युत पुरवठा अखंडीत सुरु राहील, याची दक्षता घ्या. वैद्यकीय टीम तैनात ठेवा, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, घन कचरा संकलनाची सोय करा. सर्व तयारी 5 तारखेला पूर्ण होईल, याची दक्षता घ्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून आदरांजली अर्पण करावयाची आहे. या उपक्रमासह शाहू मिल येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्येही सर्वजण सहभागी होवूया.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी