*सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.प्रवीण मत्तीवाडे यांचा राष्ट्रीय मेडिकल पुरस्काराने गौरव*
कोल्हापूर – समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान डॉक्टर प्रवीण मत्तीवाडे यांचा हेल्थव्ह्यूज हेल्थकेअर (scientific based Homoeopathic practice) साठी या संस्थेकडून राष्ट्रीय मेडिकल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉक्टरांचे काम समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी यावेळी काढले. वाशीमध्ये पार पडलेल्या वैद्यकीय परिषद व पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात – नवनवीन संशोधन करणारे वैद्यकीय तज्ज्ञ व संस्थां, प्रतिष्ठित डॉक्टर, आशियाचे सर्वोत्तम हेल्थकेअर, डॉक्टररत्न, आरोग्य विभूषण, राष्ट्रीय मेडिकल व फार्मा रत्न श्री सम्मान अशा विविध विभागांमधील कर्तृत्ववान व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कोल्हापूरचे सुपुत्र व होमिओपॅथिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉ प्रवीण मत्तीवाडे यांचा कोरानामध्ये होमिओपथीक औषधामध्ये संशोधन व आय.टी.पी.असा आजार आहे. तसेच जगातील आव्हानात्मक आजारांवर त्यांनी उपचार देऊन ते पेशंट बरे केले. या संशोधन बाबींचा विचार करुन या राष्ट्रीय मेडिकल पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. हा गौरव अभिनेत्री पूनम ढिल्लो व रामय्या विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात आरोग्य व हवामान बदलावर वैद्यकीय परिषद पार पडली. यामध्ये रुग्णांचे वाढते प्रमाण, बदलते हवामानः हेल्थकेअर कृतीसाठी एकसंध आवाहन या संकल्पनेवर उच्चस्तरीय वैद्यकीय परिषद पार पडली. यावेळी डॉ. ओम. पी. खर्बंदा म्हणाले की, आरोग्यविषयक प्रणालींनी हवामान बदल व रुग्णांचे वाढते प्रमाण यावर उपाय शोधण्यासाठी नवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. सहकार्य व शाश्वत उपाय अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कझाकस्तान मेडीकल युनि्हर्सिटी चे संचालक डॉ. फारूक शेख यांनी, जागतिक आरोग्य समुदायाला विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे व भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत धोरणे तयार करणे आवश्यक असल्याचे म्हटले.
यावेळी हेल्थव्ह्यूज ऑनलाईन.कॉम मासिकाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी रामय्या विद्यापीठाचे प्रो. व्हॉईस चान्सलर, डॉ. ओम पी. खर्बंदा, डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ. विभा हेगडे, राज्य निमाचे अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी, कझाकिस्तान मेडिकल युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. फारुख शेख, हेल्थव्ह्यूझऑनलाईन. कॉमच्या सहसंस्थापक दीप्ती वर्मा व शाहिद अली खान आदी उपस्थित होते.