पुणे येथे उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पदावर बदली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदली निमित्त कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ व रेशन कार्डधारकांच्या वतीने त्यांना कोल्हापूर जिल्हा रेशन संघटना जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गेली तीन वर्ष जिल्हा पुरवठा अधिकारी व प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे त्यांच्या काळामध्ये महाभयंकर कोरोना आजार तसेच महापूराची परिस्थिती निर्माण झाली होती ह्या सर्व नैसर्गिक आपती वर त्यांनी मात करून त्यांच्या कुशल प्रशासन हाताळून सर्वसामान्य कोल्हापूरच्या जनतेला दिलासा दिला होता त्यांना निरोप देत असताना अनेक जण भाऊक झाले.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील पुरवठा निरीक्षक गजानन पवार नितीन जंगम अजय नाईक जी एल कुंभार निलेश दिवसे तृप्ती दुर्गुळे अलका लोकरे गजानन हवलदार कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रमेश पाटील मनोहर भोसले संतोष आवळे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.