WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION के. पी. साहेब तुमच्या काळातील फक्त 10 विकास कामे सांगा आणि मगच मते मागा – प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

तुरंबे येथे आमदार आबिटकर यांचा भव्य प्रचार शुभारंभ, सभेला अभुतपुर्व गर्दी…

तुरंबे – के.पी.साहेब आपल्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात केलेली फक्त 10 विकास कामे सांगा आणि मगच मते मागायला या, असे जाहीर आव्हान आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. ते तुरंबे (ता.राधानगरी) येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी विराट बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडीक होते. तर प्रमुख उपस्थितीत गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, आण्णाभाऊ उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी, जेष्ठनेते के.जी.नांदेकर, प्रा.जालिंदर पाटील उपस्थित होते. या सभेला अभुतपुर्व गर्दी झाली होती.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, तुमच्या निष्क्रियतेमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सलग दोन वेळा जनतेने निवडून दिले. लोकांच्या मनातील असलेल्या विकासाच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी अहोरात्र झटतोय. पण आपण 10 वर्षाच्या काळात केलेली 10 विकासकामे आठवून सांगा अन्यथा आपणास मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. राधानगरी मतदार संघातील जनता अनेकवर्ष विकासापासून दूर होती. गेल्या 10 वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहे. अजून अनेक कामे पूर्ण करावयाची असून भविष्यात राज्यातील प्रगत मतदारसंघ म्हणून राधानगरीची ओळख निर्माण करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन आम.आबिटकर यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडीक म्हणाले की, राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास झालेला आहे. दुसरीकडे मात्र लबाडीचे राजकारण करून लोकांना फसविण्याचा उद्योग सुरू आहे. विस्ताराने प्रचंड मोठा असलेल्या या मतदार संघातील 350 हून अधिक गावांचा परिपुर्ण विकास साधण्याचे काम आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून झालेले आहे. चाळीस वर्षात पाण्याच्या कलशाचे का पुजन झाले नाही असा ही त्यांनी सवाल यावेळी उपस्थित केला. आमदार आबिटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाकडे आमदार म्हणून परिचीत आहेत. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. म्हणूनच राधानगरी मतदार संघात रस्ते, आरोग्य, पाणी, विज, लघु प्रकल्प यासारखे रखडलेल्या प्रश्नांसाठी केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारा जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून आमदार आबिटकर यांचा उल्लेख करावा लागेल. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लाऊन काम करणाऱ्या माणसाला राधानगरी मतदार संघातील जनता एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आण्णाभाऊ उद्योग समुहाचे अशोक चराटी म्हणाले, दुर्गम समजला जाणारा आजरा तालुका आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्रगत बनू लागला आहे. वाड्या-वस्यांाावर विकास कामे पोहचली आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यातील जनता आमदार आबिटकर यांना मोठं मताधिक्य देऊन विजयी करतील.

यावेळी बोलताना प्रा.जालिंदर पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना आणि बहीणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्य आमदार प्रकाश आबिटकर यांना मतदार विजयी करून राधानगरीचा बाजीगर वाजत-गाजत विधानसभेमध्ये पाठवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आरपीआय राज्य सरचिटणीस प्रा.शहाजी कांबळे म्हणाले, लोकसभेला संविधान बदलणार असे फेक नरेटीव्ह पसरवून दलीत समाजाची दिशाभूल केली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभेला दलित समाज अशा खोट्या भूलथापांना बळी पडणार नसून विकासाचे आयडॉल असणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय दलित समाजाने घेतला आहे.

यावेळी सह्याद्री साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब नवणे, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, अरुणराव जाधव, कल्याणराव निकम, सुर्याजीराव देसाई, मदनदादा देसाई, निवासराव देसाई, विलास रणदिवे, तानाजीराव चौगले, वंदनाताई जाधव, प्रविणसिंह सावंत, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, डॉ.सुभाष जाधव, रंगराव मगदूम, संभाजीराव आरडे, संदीप मगदूम, गोविंदराव चौगले, जी.डी.पाटील, व्ही.टी.जाधव सर, रंगराव पाटील, ॲड.प्रशांत भावके, दिपक शेट्टी, संग्रामसिंह पाटील, संग्रामसिंह कडव, विजयराव बलुगडे, दौलतराव जाधव, विजय महाडीक, चंद्रशेखर पाटील, मानसिंग पाटील, संदीप वरंडेकर, सुभाष चौगले, विलास पाटील, विलास नाईक, दशरथ अमृते, विजयसिंह पाटील, सचिन वारके, यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विजय बलुगडे यांनी केले तर आभार अशोकराव फराकटे यांनी मानले.

के. पी. ढोंगी व विश्वासघातकी
माजी आमदार के.पी.पाटील नेमक्या कोणत्या पक्षात हे पहिल्यांदा बघावे लागेल कारण के.पी.साहेब रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी चुळ भरायला दुसऱ्या पक्षात जातात. त्यांनी निष्ठेचे तत्वाज्ञान आम्हाला शिकवू नये. माजी आमदार हरिभाऊ कडव, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बिद्रीचे माजी चेअरमन हिंदुराव बळवंत पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव यांना फसवणारे के.पी.साहेबत हे ढोंगी व विश्वासघातकी असल्याचा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला.

महागद्दार के. पी.
माजी आमदार के.पी. पाटील हे आमदार आबिटकर यांच्या विरोधात तिसऱ्यांना निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे तिन्ही निवडणूकीत आमदार आबिटकर यांचे पक्ष शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण आहे. पण के.पी.यांचे चिन्ह व पक्ष सातत्याने बदलले असल्याने के.पी.हेच महागद्दार असल्याचा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी लगावताच उपस्थितांनी देखील प्रचंड शिट्या व टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.