कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून काम करता आले हे भाग्यच..!- दीपक केसरकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

-मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करता आले, हे माझे भाग्यच असून जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करण्यात यतील, असे भावनिक उद्गार काढून निसर्गसंपन्न कोल्हापूर जिल्हा भविष्यात राज्यासह देशातील अग्रगण्य जिल्हा ठरेल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

–

 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार व जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सदिच्छा संवाद कार्यक्रम झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने माजी पालकमंत्री केसरकर यांना कोल्हापुरी फेटा आणि श्रीअंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन.पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • माजी पालकमंत्री केसरकर म्हणाले, अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम केले. मात्र कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून काम करताना सुख आणि समाधान मिळाल्याची भावना व्यक्त करताना माजी पालकमंत्री केसरकर यावेळी भावनिक झाले होते. ते म्हणाले, कमी वेळात कोल्हापूरचे लोक उकृष्ट काम करु शकतात, हे दसरा महोत्सवावेळी दिसून आले. जिल्ह्यातील गड, किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल. कोल्हापूरच्या नागरिकांनी आजवर साथ दिल्याबदद्ल त्यांनी कोल्हापूरकरांप्रति आदर व्यक्त केला.
  • पंचगंगा प्रदूषण मुक्ती, पंचगंगेची स्वच्छता, रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन मधून तालमींना निधी, रंकाळा सुशोभीकरण पंचगंगा घाट व शिवाजी पुलावरील विकासकामे सुरु आहेत.
  • देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्हा असून त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास साधला जात आहे. रंकाळा, नृसिंहवाडी राधानगरी, दाजीपूर अभयारण्य, पारगड किल्ला आदी स्थळांचा विकास होणार आहे. कोल्हापूरला पत्रकारितेचा इतिहास असून पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पद्मश्री डॉक्टर ग. गो.जाधव अध्यासन केंद्र उभारण्यात आले आहे, असे सांगून मधाचे गाव पाटगाव चा देश देश पातळीवर गौरव होणे अभिमानास्पद आहे, असे सांगून त्यांनी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

कोल्हापूरच्या विकासासाठी सुरु झालेले सर्व प्रकल्प यापुढेही सुरु राहतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सांगितल्याचे ते म्हणाले.

खासदार धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मंत्री दीपक केसरकर हे जिल्ह्याच्या विकासासाठी मनापासून झटले. चांगल्या कामातून ते कोल्हापूरांच्या नेहमी स्मरणात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लावले. कोल्हापूरला पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक कल्पक प्रस्तावांना मान्यता दिल्यामुळे अनेक विकासात्मक प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.