रा. स्व. संघ कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कामगार, शेतकरी, वनवासी अशा विविध घटकांना संघटित करून त्यांच्या उन्नतीसाठी संघ प्रयत्नशील

कोल्हापूर प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजाभाऊ भोसले स्मृती भवन कार्यालयात शनिवारी (दि. १५) स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोक उत्कर्ष समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी सैनिक शिवाजीराव पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंचालक भगतराम छाबडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवृत्त पर्यवेक्षक संजय जाधव, प्राध्यापिका डॉ. शैलजा मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजाभाऊ भोसले रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सेवा प्रमुख रवी मिसाळ यांनी केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व उपलब्ध रुग्णोपयोगी साहित्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोक उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर यांनी केले. त्यांनी समितीच्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच कार्यविस्ताराची माहिती देत अधिकाधिक नागरिकांनी लोक उत्कर्ष समितीच्या सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त पर्यवेक्षक संजय जाधव म्हणाले, “समाजाला संघटित करून देशहिताचे काम करणे ही संघाची कार्यपद्धती आहे. हे कार्य अधिक व्यापक होणे आवश्यक आहे.”

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

विभाग सहसंचालक भगतराम छाबडा म्हणाले, “संघाचे काम समाजाच्या सर्व क्षेत्रांत सुरू आहे. कामगार, शेतकरी, वनवासी अशा विविध घटकांना संघटित करून त्यांच्या उन्नतीसाठी संघ प्रयत्नशील आहे. पूर्वांचलासारख्या दुर्गम भागात संघाने सेवाकार्याच्या माध्यमातून एकात्मतेची भावना निर्माण केली. त्यामुळेच पूर्वेकडील सातही राज्ये भारताचा अविभाज्य घटक म्हणून अधिक दृढपणे जोडली गेली आहेत. समाजातील सज्जनशक्तीच्या आधारे देशाचे पुनरुत्थान करणे हे संघाचे ध्येय असून, या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाहक दीपक सांगलीकर यांनी केले, तर अनुप हळदीकर यांनी आभार मानले. विजय पुजारी यांनी संपूर्ण वंदे मातरम्चे गायन केले. यावेळी लोक उत्कर्ष समितीचे उपेंद्र सांगवडेकर, सुनील पाटील, राम खांडेकर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.