आबिटकर नॉलेज सिटी येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भुदरगड तालुका जेष्ठनागरीक संस्थेचे अध्यक्ष बी. एस. माने सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

गारगोटी प्रतिनिधी – देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन आबिटकर नॉलेज सिटी येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भुदरगड तालुका जेष्ठनागरीक संस्थेचे अध्यक्ष बी. एस. माने सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्याला राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी भाई आनंदराव आबिटकर व संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर सर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा.अर्जुन आबिटकर सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रवास आणि स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान यांवर प्रकाश टाकला. ‘विकसित भारता’चे भविष्य हे युवा पिढीच्या हाती आहे, यावर त्यांनी भर दिला आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी इंजिनीअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश पाटील, कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपाली गोसावी आदींनी मनोगते व्यक्त केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी पाल सरपंच ज्योती सुतार, उपसरपंच दिगंबर देसाई, अकुंशबापू चव्हाण, गारगोटी उपसरपंच भरत शेटके, अरुणराव शिंदे, सर्जेराव मोरे, प्रशांत भोई, विजय सारंग, व्ही. के. कदम सर, चंद्रकांत चव्हाण, रणधिर शिंदे, सुरेशराव सुर्यवंशी, राजू चिले यांच्यासह विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता मोहोळकर, प्रास्ताविक प्रा. कविता कुरळे यांनी केले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.