शित्तूर-वारुण तालुका – शाहूवाडी येथील उदगिरी पैकी केदारलिंगवाडी येथील शेतकरी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी. पुढील उपचारासाठी सी. पी. आर. (कोल्हापूर) येथे दाखल.
केदारलिंगवाडी येथे वास्तव्यास असलेले शेतकरी बंडू बाबू फिरंगे वय (61) वर्ष हे आपली पाळीव जनावरे घेऊन पाणवट्यावर पाणी पाजण्यासाठी गेले असता रानगव्याने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या बाजूला बरगडीच्या वरती दुखापत झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर – वारुण येथे करून पुढील उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. चांदोली अभ्यारण्यालगत असलेल्या या परिसरात जंगली प्राण्यांचे हल्ले हा नेहमीचाच विषय होऊन बसला आहे. काही दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज त्याच परिसरात घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा जंगली श्वापदपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचा बंदोबस्त व्हायला हवा ही मागणी नागरिकांनातून होतं आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक श्री. वाडे यांनी दवाखान्यात येऊन पेशन्ट ची पाहणी केली. यावेळी दत्तात्रय मगदूम, सुधीर पाटील, समीर कदम, संतोष फिरंगे उपस्थित होते.