पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
अमेरिकेतील शेती आम्ही अमेरिकेत एका मोठ्या शेतकऱ्याकडे त्याच्या फार्मवार गेलो होतो. त्याची जवळपास 200 एकर शेती असून त्यापैकी 100 एकरात मका व सोयाबीन ची पिके घेतात व राहिलेल्या 100 एकर मध्ये त्यांनी खेळासाठी, तसेच गुरांचा गोठा, गोडाऊन, प्रोससिंग साठी कारखाना, शेळी पालन अशी विविध व्यवसाय सुरु केले आहेत. इथे जमीन सपाट असून मध्ये कुठेही बांध नसतात. फक्त शेताच्या बाजूला झाडें असतात किंवा मधील रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडें लावलेली असतात. ही झाडें या सिझनमध्ये रंगीत होतात.हा फार्म मुख्य शिकागो शहराच्या उपनगरापासून 15 किलोमीटर अंतरावर होता.
इथे शहरातील शाळेच्या मुलांसाठी त्यांनी ऑक्टोबर महिन्यात कॉर्न व पंपकिन फेस्टिवल अरेंज केला होता. ठराविक प्राथमिक शाळेतील मिळून 1000 मुले व त्याचे पालक यांना महिन्यातून एक दिवस ठरवून दिला जातो त्यांनी त्या फेस्टिवल ला मुलांना घेऊन येणे व दिवसभर तिथे मुले खेळतात, त्यासाठी रेस्टॉरंट व स्टॉल असतात. या फेस्टिवल मध्ये मुले व पालक मुलांना कारमधून घेऊन येतात व दिवसभर थांबतात. या फार्म मध्ये त्या शेतकऱ्याचे स्वतःचे घर मध्यवर्ती असते.
आम्ही तिथे गेल्यावर प्रथम तिकीट काढले. दिवसभर प्रत्येकी 15 डॉलर तिकीट होते. तिकीट काढून आत जाण्यासाठी रोड मार्क केलेले होते तिथून सुरुवातीला त्यांचे विक्रीसाठी ऑफिस होते. आत गेल्यावर एका विभागात लहान पंपकिन पासून 20 किलो वजन असणारे विविध रंगाचे लाल, पिवळे, हिरवे भोपळे ठेवलेले होते. ते मोठया रॅक मध्ये विविध रचना करून ठेवले होते. लोक मुलांना घेऊन तिथे फोटो काढत होते. ज्यांना भोपळे विकत घ्यायचे होते ते लहान ट्रॉली त घेऊन पावती करत होते
तिथून फोटो काढून आम्ही पुढे गेलो. तिथे लाकडाची घरे, कॅसल, रोप वे केले होते त्यावर मुले खेळत होती. तिथून पुढे पंपकिन जंपिंग होते त्यावर मुले मनसोक्त उड्या मारत होती. नंतर आम्ही पुढे गेलो तिथे एक मोठ्या गोडाऊन मध्ये मक्याच्या धाटापासून व पाल्यापासून मोठे ब्लॉक तयार करून त्याचे चौकोनी आकाराचे बिल्डिंग सारखे गट्ठे रचून मुलांना नाचण्यासाठी तयार केले होते त्यात गवताचे बोगदे केले होते त्यात मुले खेळत होती. त्याच्या पुढे एका गोडाऊन मध्ये मोठ्या कायलीसारखे हौद होते त्यात सोललेले मक्याचे वाळलेले दाणे एका टॅंक मध्ये दहा टन असे दोन कायली भरून ठेवले होते. त्यात मुले
नाचत होती, लोळत होती. मक्याचे दाणे अंगावर उडवत खेळत होती. तिथल्या वर्करला विचारले असता त्याने सांगितले की हे मक्याचे दाणे नंतर कॅटल फीड बनवण्यासाठी वापरतात.मुलांचे पालक मुले खेळत असताना फोटो काढत होते.
तिथे सर्व पाळीव प्राणी एका मोठ्या शेड मध्ये मुलांना पाहण्यासाठी ठेवले आहेत. एका विभागात लामाche कोकरू व त्याची आई होती. हा प्राणी उंट व हरीण यांचे कॉम्बिनेशन आहे. तो साधारण हरीण व उंटासारखा दिसतो. दुसऱ्या विभागात शेळ्या होत्या, तिसऱ्या विभागात पांढऱ्या मेंढया होत्या, चवथ्या विभागात व्हाईट पिग म्हणजे डुकरीण व तिची 10 पिले होती, पाचव्या विभागात घोडा व पिल्लू होते, सहाव्या विभागात गाढव होते, सातव्या विभागात क्रॉस ब्रीड गाय व वासरू होते. मुले व पालक लहान प्राण्यांना गवत खायला घालत होती.नंतर फार्म च्या एका बाजूला मोठी मशीनरी, ट्रॅक्टर, बुलडोझर, कॅटल फीड बनवायचे कारखाने, मोठी गोडावून होती. स्प्रे पम्प, इतर मशीनरी होती.फार्म वर बंदिस्त शेळीपालन साठी एक शेड होती. त्यात वेगवेगळ्या कंपार्टमेन्ट मध्ये वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या व कोकरे होती. तिथे मुले व पालक त्यांना गवत घालत होते व फोटो काढून घेत होते.
एका बाजूला काऊ राईड म्हणजे वासराची चित्रे काढलेले छोटे डबे आगगाडी सारखे एकमेकांना जोडले होते त्यात लहान मुलांना बसवून मोकळ्या शेतातून व मक्याचे शेत दाखवून आणत होते. मोठ्या लोकांना व मुलांना एकत्र फिरण्यासाठी पंपकिन राईड म्हणजे भोपळ्याच्या आकाराचे डबे ट्रॅक्टर ला जोडून त्यातून मक्याच्या शेतात फिरवून आणत होते. प्रत्यक्ष मक्याच्या शेतात जाऊन लोक आत फिरून फोटो काढून येत होते. मक्याची कणसे काही ठिकाणी वाळली होती तर काही मका हिरवा होता. मका ithe ओला असताना कापत नाहीत. कणसे पूर्ण झाडावर वाळवली जातात व नंतर मशीनने मका कापणी करतात व दाणे काढणे व धाटे मशीन मध्ये कट करून त्याचे प्रेस करून गट्ठे बनवतात व साठवून ठेवतात. हा वाळलेला चारा ते वर्षभर वापरतात. बाकी कॅटल फीड जनावराना वर्षभर घालतात. ज्यांच्याकडे जास्त गाई आहेत त्यांच्या स्वतःच्या चीज फॅक्टरी आहेत. शिवाय मक्यापासून दारू बनवली जाते. He सर्व आपल्याला एकाच फार्मवर पाहायला मिळते. या फार्म वर भोपळा, चीज, ज्यूस, कॅटल फीड, गवत हे सर्व विक्रीसाठी ठेवले होते. काही शेतकऱ्यांच्या सफरचंदाच्या बागा आहेत इथे लोक सुट्टी दिवशी सफरचंद तोडायला जातात.सर्व पाहून व खेळून झाल्यावर विश्रांती साठी टेन्ट असतात शिवाय रेस्टॉरंट मध्ये खाण्याचे पदार्थ, कॉफी हॉट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक असतात. अशा प्रकारे इथले लोक मुलासोबत पंपकिन फेस्टिवल व कॉर्न फेस्टिवल साजरा करतात.
लेखक.. जेष्ठ नागरीक
संपूर्ण नाव: विनायक शंकर कुलकर्णी, पत्ता : प्लॉट न.१८ उमाशंकर,व्यंकटेश कॉलनी ,आपटेनगर,राधानगरी रोड,कोल्हापूर ४१६०११ फोन नंबर :९४२२०३४५०० जन्म तारीख :८ जून १९५१ शैक्षणिक पात्रता : कृषी पदवीधर , B.SC.(Agri ) सेवाकाल : बँक ऑफ इंडिया मध्ये १९७६ ते १९९० पर्यंत कृषी सहाय्यक व १९९० ते २०११ पर्यंत अधिकारी व शाखाधिकारी म्हणून कार्यरत . सामाजिक सेवेची आवड असलेने बँकेत ३५ वर्षे नोकरी पैकी ३२ वर्षे ग्रामीण भागात नोकरी केली. कौटुंबिक माहिती. पत्नी.सौ वृषाली कुलकर्णी,गृहिणी ,मुलगा :विशाल – एम.एस.पी.एच.डी.सध्या सिंगापूर येथे नोकरी ,मुलगी :सौ मधुरा तेरवाडकर:बी ई, इलेक्ट्रोनिक्स.
मिळालेले पुरस्कार: ; बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत असताना १५० महिला बचत गटांची स्थापन करून त्याना व्यवसायासाठी अर्थसाहाय मिळवून देणेत मार्गदर्शन केल्याने सन २००९-२०१० व सन २०१० -२०११ साली सर्वोत्क्रुष्ठ शाखाधिकारी म्हणून राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त. सेवा निवृत्तीनंतरचे कार्य :बँक ऑफ इंडिया मधून ३० जून २०११ रोजी निवृत्त झाल्यानंतर मी जुलै २०११ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मध्ये प्रथम जिल्हा सह कार्यवाह व नंतर जिल्हा कार्यवाह म्हणून काम करण्यास सुरुवात केली.या समिती अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ६ रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु केली आहेत .सांगली येथील येरळा प्रकल्प यांच्या सौजन्याने दुर्गम व डोंगराळ भागात ३०० कुटुंबाना सौर दिवे देण्यात आले.ग्रामीण भागात संस्कार वर्ग चालवणे,संस्कार शिबीर घेणे ,आरोग्य शिबिरे घेणे असे उपक्रम राबवले जातात.ग्रामीण भागात ४० गावात मोफत प्रथमोचार करणेसाठी आरोग्य रक्षक नेमून सेवा दिली जाते, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ भटक्या कुटुंबाना वेळोवेळी मदत पोहोचवणे,त्यांच्या मुलांना प्रत्येक महिन्याला पूरक पोषण आहार पुरवला जातो अशी कामे केली जातात.या काळात केलेल्या कामाचा आढावा कोल्हापूर येथील दैनिक महाताष्ट्र टाईम्स मध्ये १ ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रसिध्द केला होता त्याची प्रत सोबत जोडत आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून जनकल्याण समितीतर्फे जे ज्येष्ठ नागरिक विनापत्य ,निराधार,ज्यांना पेन्शन नाही किंवा अन्य उत्पन्न नाही,जे स्वतःच स्वयपाक स्वतः करू शकत नाहीत अशा ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य ,विनाहेतू जेवणाचा डबा दररोज घरपोच करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.येथील एका गरजू कुटुंबातील दोन मुलीना शैक्षणिक खर्चासाठी दंतक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१७ पर्यंत साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष म्हणून काम पहिले.त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालणे स्पर्धा आयोजित करणे,त्यांच्या साठी व्याख्याने,आरोग्य शिबिरे,प्रवचने,विविध करमणुकीचे कार्यक्रम ,सहली आयोजित करणे ई.सामाजिक कामे केली. दिनांक १ ऑक्टोबर २०१६ रोजी कोल्हापूर येथील कै. गोविंदराव कोरगावकर सामाजिक ट्रस्ट तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल स्मृती गौरव पुरस्कार बहाल करणेत आला. दिनांक २० नोवेम्बर रोजी कोल्हापूर येथील मंथन फौडेशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार देणेत आला आहे. स्वातंत्र्य सैनिक नारायणराव भगवंतराव कुलकर्णी यांचा लातूर संस्थेतर्फे नारायणी पुरस्कार प्राप्त. शिक्षण विकास परीषद शिरोडा गोवा तर्फे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दि.४ नोवेम्बर २०१८ ला प्राप्त.
शोभा कोकीतकर फाऊंडेशन यांच्या तर्फे भारत गौरव पुरसकर 2022 प्राप्त ज्येष्ठ नागरिकांना सुखी व आनंदी जीवन जगणेसाठी व्याख्याने देणे, त्याना एकटेपणात सोबत मिळवून देणे,तसेच वृधाश्रमाना भेटी देऊन तेथील वृध्द नागरिकांची विचारपूस करणे असे उपक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन व प्रवास वर्णन यावर दैनिक वृत्तपत्रात ३० पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकां साठी सहलीचे आयोजन करणे.सहलीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे
विनायक कुलकर्णी मो.९४२२०३४५००
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.