कोल्हापूर ( सारिखा शिंदे)– प्रवाशांच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिक ट्रॅव्हल्सने आता हैद्राबाद मार्गावरही आपली सेवा सुरू केली आहे. हैद्राबादमधील नामांकित VSR ट्रॅव्हल्ससोबत टायअप करून कार्तिकने आपल्या ताफ्यात हैद्राबाद मार्ग सुरु केला आहे. ही नवी बस समाविष्ट केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना आणखी एक दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार हैद्राबाद मार्गावरील सर्व शहरांना आता कार्तिकच्या बसेसने काेल्हापूर हैद्राबाद जाेडले जाणार आहे. पहिल्याच दिवशी या हैद्राबाद बसला प्रवाशांनीही पसंती दिलीय.
सध्या कार्तिक ट्रॅव्हल्स पुणे, मुंबई, बोरीवली, नांदेड, तुळजापूर, साेलापूर या मार्गांवर उत्तम सेवा देत आहे. वेळेचं काटेकोर पालन, अनुभवी चालक-वाहक, आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज सस्पेन्शन बसेस यामुळे कार्तिकने प्रवाशांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
कार्तिकच्या बसेस म्हणजे टापटिप स्वच्छता, एसी- सुविधा, आणि प्रवाशांच्या गरजेनुसार सुसज्ज सेवा. प्रत्येक प्रवासात प्रवाशांना याेग्य सुविधा, सुरक्षितता देण्याचा कार्तिकचा प्रयत्न असतो.ऑनलाइन बुकिंगसाठी RedBus, Paytm यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्धता, सोपी तिकीट प्रक्रिया आणि वेळेवर सेवा यामुळे कार्तिक ट्रॅव्हल्सचा ठसा डिजिटल युगातही उठून दिसतो. आँन लाईन बुकींगमध्येही कार्तिक ट्रँव्हल्सने अव्वल स्थान राखले आहे. नियमांचे काटेकाेरपणे पालन, सुरक्षित वाहतूक, प्रवाशांची काळजी, सुविधा यामुळेच कार्तिक व प्रवाशी वर्गाचे आपलेपणाचे नाते कायम टिकविले आहे. “प्रवास करायचा तर कार्तिकनेच” ही भावना अनेक प्रवाशांच्या मनात खोलवर रुजली आहे. कारण केवळ प्रवास नव्हे, तर एक विश्वासाचं नातं कार्तिकने निर्माण केलं आहे.
स्पर्धेच्या युगातही दर्जा, वेळेचं भान आणि माणुसकीची सेवा जपणारी कार्तिक ट्रॅव्हल्स ही एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. नव्या मार्गाच्या शुभारंभाने ही ओळख आणखी बळकट होणार, यात शंका नाही.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.












































































