देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी

अहिंसेच पुजारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला साजरी करण्यात येते.त्या निमित्ताने भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.याकरीता राजकीय पुढाऱ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची जोपासना करणे आवश्यक आहे.कारण आपण स्वतंत्र भारतात रहातो.त्यामुळे आपल्याला आपल्याच देशात आपल्याच लोकांच्या गरजा व देशाचा विकास या उद्देशाने राजकीय पुढाऱ्यांनी कार्य करण्याची गरज आहे.राजकीय पुढाऱ्यांना याकरिता जास्त मेहनत  किंवा मोठा संग्राम करण्याची गरज नाही.फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण करावे व आपली धनसंपत्ती देशहितासाठी समर्पित करावी एवढे काम जर आत्मियतेतून केले तर अवश्य गांधीजींच्या विचारांना दुजोरा मिळेल आणि देश सुजलाम सुफलाम होण्यास मोठी मदत मिळेल.

देश स्वतंत्र करण्यासाठी देशाला १५० वर्षे लागलीत म्हणजेच ५४७५० दिवस यात क्रांतीकारी विचार व अहिंसेचा मार्ग यातुनच १५ ऑगस्ट१९४७ ला स्वतंत्र भारत उदयास आला.भारत स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला व आपले संपूर्ण आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवले व इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले.गांधीजीचा कार्यकाळ जन्मापासुन तर मृत्यू पर्यंत अत्यंत संघर्षमय रहाला व आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले.३० जानेवारी १९४८ हा दिवस महात्मा गांधींसाठी काळ ठरला.नाथुराम गोडसे महात्मा गांधींच्या विचारां सहमत नव्हते.त्यामुळे ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे  यांनी दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींजींच्या ४० मिनिटे आधी पोहोचले व गांधीजी सभेला जात असताना नाथुराम यांनी तीन गोळ्या झाडून महात्मा गांधींचा खुन केला व अहिंसेचा दिवा नेहमीसाठी मावळला यानंतर संपूर्ण भारत स्तब्ध झाला.तेव्हापासुन ३०जानेवारी हा दिवस शहिद दिवस म्हणून पाळन्यात येतो.भारतात फक्त ३०जानेवारी हा एकमेव शहिद दिवस नसुन १५० वर्षांच्या काळात लाखोंच्या संख्येने ज्यांनी-ज्यांनी बलीदान दिले ते संपूर्ण दिवस आपल्यासाठी शहिद दिवसच आहे.

महात्मा गांधी हे अहिंसेचे मुख्य मार्गदर्शक होते.त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता हा सन्मान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला.महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग,राजगुरू, तात्या टोपे,चंद्रशेखर आझाद, झाशीची लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक,लाला लजपतराय इत्यादीसह लाखो शहिदांच्या बलिदानाने अखंड भारत मोठ्या डौलाने उभा झाला.यामुळे देशातील १३५ करोड जनता स्वतंत्रपणे बागडताना दिसते.आज देशातील संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या अर्थाने गांधींच्या तत्वांची आवश्यकता आहे.कारण गेल्या २० वर्षांपासून ५० टक्के राजकीय पुढारी भ्रष्टाचार,माफीयाराज, बाहुबली, घोटाळे करणे, अत्याचार, गुन्हेगारी,गरीबांची संपत्ती वाममार्गाने हडप करने किंवा लुटने इत्यादी अनेक प्रकार काही राजकीय पुढाऱ्यांच्या अंगी असल्याचे दिसून येते.या ५० टक्के राजकीय पुढाऱ्यांनी जर खऱ्या अर्थाने गांधींजींचा मार्ग अवलंबला तर देश भरभराटीला अवश्य येईल.कारण महात्मा गांधी सत्य, अहिंसा या विचारांचे खरे पुजारी होते.आपण त्यांची जयंती, पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करतो तर मग त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आजचा राजकीय पुढारी अमलात व आचरणात का आणत नाही? हा प्रश्न आजही देशाच्या १३५ कोटी जनतेच्या मनात भेडसावत असतो.आज आपण विचार केला तर मुठभर राजकीय पुढारी आहेत.परंतु त्यांच्या जवळ एवढी संपत्ती आहे की त्यांच्या सात पिढ्या बसुन खावु शकते.यांचा संपूर्ण पैसा राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी एकत्र केला तर अरबो रूपयांची चल-अचल संपत्ती आपल्याला दिसुन येईल व १० ते १५ वर्षे कोणत्याही देशाजवळुन कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.

याकरीता देशातील संपूर्ण राज्य सरकारे व केंद्र सरकार यांनी निसंकोचपणे राजकीय पुढाऱ्यांनी वाममार्गाने कमवीलेली करोडोंची संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करण्याच्या उद्देशाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.तेव्हाच महात्मा गांधींना व देशाच्या शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल.देशाचे संपूर्ण सैन्य शक्ती स्थलसेना, वायुसेना, नौसेना देशाच्या रक्षणासाठी उन, पाऊस, थंडी, वादळ, सुनामी इत्यादींशी झुंज देऊन व सामना करून देशाच्या १३५ कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी ढाल म्हणून तैनात व अग्रेसर आहेत. तर मग देशातील आजी-माजी राजकीय पुढारी आपली खरी संपत्ती का लपवीतात?

रमेश कृष्णराव लांजेवार.                                     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

राजकीय पुढाऱ्यांमध्ये खरोखरच देशभक्ती, देश प्रेम, देशहित,शहिदांच्या प्रती आदर व क्रांतीकारकांच्या प्रती अभिमान असेल तर देशाच्या विकासासाठी आपली संपत्ती स्वखुशीने अर्पण करायला हवी.देशातील प्रत्येक थोर पुरुषांच्या घोषणेचा व स्लोगनचा देशहितासाठी उद्देश होता.त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र लढ्यासाठी दिलेले  ब्रिदवाक्य राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा” याचेच अनुकरण करत राजकीय पुढाऱ्यांनी आपली संपत्ती देशहितासाठी समर्पित करावी. यामुळे देशातील महागाई, बेरोजगारीची समस्या दूर होऊन देशाचा विकास भरभराटीला येवुन सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.३० जानेवारी शाहिद दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.कारण प्रत्येक वृक्ष अनंत काळापर्यंत राहिल व यामुळे शहिदांची आठवण सुद्धा अनंत काळापर्यंत राहिल आणि प्रत्येक पानात,फुलात, फळात आपल्याला शहिदांचे दर्शन अवश्य होईल.त्याचप्रमाणे वाढते प्रदुषण रोखण्यास मोठी मदत होईल.जय हिंद!     

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.