IG फुलारे यांनी केला सन्मान; म्हणाले पोलिसांना हे महत्वाचेच: वाचा सविस्तर…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

पोलीस दलात तृणधान्याचा वापर वाढण्यास चालना देणार…

कोल्हापूर – मानवाच्या आरोग्यास तृणधान्य (मिलेट) ची आवश्यकता असुन ती योग्य प्रमाणात शरीरास मिळाली पाहिजेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कॅंटीनमध्ये तसेच त्यांच्या दैनंदिन आहरामध्ये आवश्यकतेनुसार मिलेट ( तृणधान्य) चा वापर वाढविण्याबाबत चालना देणार असल्याचे मत विशेष पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारे यांनी व्यक्त केले. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व नाबार्ड, कोल्हापूर आयोजित मिलेट (तृणधान्य) महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाककृती स्पर्धेत एकुण 33 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांचा सुनिल फुलारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. स्पर्धेमध्ये निहारिका शिंदे प्रथम, विमल सुर्यवंशी द्वितीय व माधुरी पाटील तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ संदीप खाते व पद्मा माने यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी सहभाग घेवून पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल सोनाबाई दळवी व कृष्णा मोहन, रायपूर (छत्तीसगड) येथुन महोत्सवामध्ये सहभाग घेवून तृणधान्याच्या विविध पाककृती ग्राहकांना दाखवून माहिती देत असल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. पाककृती स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, डॉ. प्रतिभा ठोंबरे, डॉ. सुनिल कुमार व सुर्यप्रभा भोसले उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व इतर मान्यवर उपस्थित होते. मिलेट महोत्सवास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने गावरान ज्वारी, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील नाचणी पदार्थ आणि रायपूर येथील विशेष पाककृती महोत्सवातील आकर्षण ठरत आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.