डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतीना अभिवादन…

कोल्हापूर – डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन मंगळावरी उत्साहात साजरा करण्यात आला. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी वाय पाटील ग्रुपच्या सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्या हस्ते वि.वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुस्तक प्रदर्शन व भित्तीपत्रिका प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. मुदगल म्हणाले, मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. आपल्या मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचाही देखील आपण आदर करावा. डी. वाय. पाटील गृपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, मराठी भाषेने साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याची आवड जोपासणे गरजेचे आहे. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी अधिकअधिक संदर्भ ग्रंथ व मराठी साहित्याचा अभ्यास काळाची गरज असलायचे सांगितले. सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी जाणीवपूर्वक लावणे गरजेचे असल्यचे सांगत मुलाखती दरम्यान आपल्या विचारांची स्पष्टता महत्वाची असल्याचे सांगितले.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध मराठी साहित्याचा वारसा आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय विभाग व व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आसावरी यादव व डॉ. स्नेहल शिंदे विद्यार्थ्यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख अभिजीत मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, ग्रंथपाल अक्षय भोसले, रोहन बुचडे, संकेत लांडगे, नवनाथ कुरणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.