विजय बकरे
आमदार प्रकाश आबिटकर व कोल्हापूर संस्थांचे युवराज यशराजे छत्रपती यांच्या हस्ते पुतळा व कलश पूजन…
राधानगरी – राधानगरी धरण स्थळावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मुर्ती केंद्र स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर संस्थांचे युवराज यशराजे छत्रपती व आमदार प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते पुतळा व कलश पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे हे होते.
यावेळी छत्रपती शाहू महाराज मूर्ती स्थळ विधी वध पूजन, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच राधानगरी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तुत्वान युवक व युवती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, फेजवडीचे सरपंच फारूख नवाळे, दाजीपूरच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर, माजी सरपंच कविता शेट्टी माजी सरपंच बशी राऊत वनक्षेत्रपाल सुहास पाटील, मंडलधिकारी सुंदर जाधव, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रवीण पारकर, समीर निरुखे यांच्यासह राधानगरी,पडळी ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, शेतकरी यांच्यासह तालुक्यातील अनेक शाहू प्रेमी जनता यावेळी उपस्थित होते.