गिरनार ला काेल्हापूरातून २०० भाविक रवाना, साळुंखे, भूमी ट्रँव्हल्सचे नियाेजन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

गुजरात येथील सुप्रसिद्ध व सर्वात उंच डोंगरावर वसलेल्या गिरनार देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी तसेच पर्यटन स्थळ म्हणून भाविक तसेच पर्यटक पसंती देत आहेत. कोल्हापूर येथूनही सातत्याने व दरवर्षी भाविकांची जाण्याची परंपरा वाढत चालली आहे. यंदाही कोल्हापूर येथून गुरुवारी २०० भाविक गिरनार येथे रवाना झाले आहेत. याचे नियोजन शिवाजी पेठेतील निलेश इंगवले व साळुंखे मित्र परिवारांनी केले असून, या सफरची सर्वोतपरी व्यवस्था भूमी टूर्स अँन्ड ट्रँव्हल्सचे मालक सुनिल सरदार यांनी केले आहे. 

VIDEO पाहण्यासाठी निळ्या लिंकला क्लिक करा… .https://youtu.be/V_zlZiulqLs?si=fZ9mnVcWQJodSHVY

गुरुवारी रात्री सह्याद्री एक्सप्रेसने हे सर्व भाविक रवाना झाले. शिवाजी पेठेतील निलेश इंगवले, राजेश साळुंखे्, रितेश साळुंखे, मयूर साळुंखे, विनायक पांगळे, अनिकेत पाटील, नितीश जाेशी आदी मित्र परिवारांसह २०० भाविक सह्याद्रींने गेले. यात सर्वात वयाेवृद्ध भाविकांचाही समावेश असल्याचे निलेश इंगवले यांनी सांगितले. यंदाचे चाैथे वर्ष गिरणारची ट्रीप असल्याचे राजेश साळुखे व मयूर साळुंखे म्हणाले. गिरनार च्या अनेक यशस्वी ट्रीप केल्या असून आणखी चार ट्रीपचे आयोजन पुढील काळात असल्याचे भूमी ट्रंँव्हलसचे मालक सुनिल परदेशी यांनी सांगितले. ही ट्रीप यशस्वी व्हावी आणि भाविकांच्या स्वागतासाठी तसेच त्यांना रवाना करण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनेचे शिवनाथ बियाणी यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक सुहास गुरव, सचिव विनायक वाळवेकर, खजाणीस सूरज कुलकर्णी, सहसंघटक प्रशांत चाैगुले यांनी शुभेच्छा दिल्या. 

गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचे बाविसवे तीर्थंकर भगवान नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. काेल्हापूरसह महाराष्ट्रातून असंख्य भाविक या तीर्थस्थळी जात असतात. विविध टूर्स अँन्ड ट्रँव्हल्स सेवा देत असतात. भूमी टुर्स अँन्ड ट्रँव्ह्लल्स यांनी देखिल अनेक पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांच्या ट्रीप यशस्वी केल्या आहेत. 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.