“सुरांचा आवाज थांबला… पण प्रतिध्वनी अमर झाला”

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की, त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसलेंचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पाडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचं गाणं कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.

सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली !

 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.