पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व कर्करोग शस्त्रक्रिया सुविधा
आठवड्याच्या दर बुधवारी बाह्यरुग्ण विभाग इमारतीत देण्यात येणार सेवा; शनिवारी उद्घाटन
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मध्ये कर्करोगावर (कॅन्सर) उपचाराची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व प्रकारच्या कर्करोगावर (कॅन्सरवर) मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. कर्करोगावरील उपचार सुविधेचा उद्घाटन समारंभ सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे शनिवार दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील तसेच इतर शेजारी जिल्ह्यातील विविध आजाराचे रुग्ण येत असतात. सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कर्करोगाच्या (कन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारावर उपचाराची सुविधा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध नाही. तसेच या आजाराचा खर्च गोरगरिब रुग्णांना परवडणारा नाही. यासाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार असून शनिवार दि. 9 सप्टेंबर 2023 पासून आठवड्याच्या दर बुधवारी खोली क्र. 119 बाह्यरुग्ण विभाग इमारत येथे सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये बाह्यरुग्ण सेवा सुरु होणार आहे.
या विभागास भेट देणाऱ्या रुग्णांची आवश्यक ती तपासणी झाल्यानंतर रुग्णास गरजेनुसार आवश्यक त्या शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञांमार्फत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये मोफत केल्या जातील. याकरीता कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर यांच्याकडील कॅन्सर तज्ज्ञ मानद सेवेद्वारे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.
कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, कोल्हापूर कॅन्सर सेंटर व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.