VIDEO पहाः पंतप्रधान काेल्हापूर रेल्वेस्थानकात आँन लाईन येणार…रेल्वे स्थानकाचा संपूर्ण पुनर्विकास समारंभ हाेणार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूरः रेल्वे मंत्रालयाने प्रवासी सुविधांना केंद्र स्थानी ठेवून, रेल्वे स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकास करण्याचे धोरण ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत भारतीय रेल्वेच्या १३०९ स्थानक पुनर्विकासाठी नामांकित केले असून, ६ आँगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०८ रेल्वे स्थानकांच्या  पुनर्विकासाचा व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे पायाभरणी समारंभाचा आयेजित केला आहे. त्यामुळे समस्त कोल्हापूरवासियांना याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन, मध्य रेल्वे पुणे विभागाचे कमर्शियल मॅनेजर आणि जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

यायला लागतंय…

याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, भारतीय रेल्वेच्या 1309 स्थानकांना पुनर्विकासासाठी नामांकित केले आहे. यामध्ये पुणे विभागातील 16 स्थानकांसह मध्य रेल्वेच्या 76 स्थानकांचा समावेश आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, केडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, तळेगाव आणि आकुर्डी या तीन स्थानकांसह मध्य रेल्वेवरील 38 स्थानकांवर या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी गती शक्ती युनिटकडे सोपविण्यात आली आहे. विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी एजन्सी नेमण्यात आल्या असून, याबाबत मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी या विशेष कार्यक्रमासाठी खासदार, आमदार, येथील नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शाळा, विद्यार्थी, पद्मश्री पुरस्कार विजेते, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक, पोस्ट अधिकारी आणि शालेय मुले, स्वयंसेवी संस्था इत्यादी उपस्थित राहतील असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगितले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून निबंध आणि चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ही योजना अधिक प्रभावी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आयोजित कार्यक्रमात, संबंधित शहरातील विविध शाळा. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यानंतर या कार्यक्रमात मान्यवर उपस्थितांना संबोधित करतील, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशन नंतरच्या पुनर्विकासाचे नियोजनबद्ध स्वरूप दर्शविणारा व्हिडिओ दाखवला जाईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, 11:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित करतील, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आलेय.

ब्लू लाईनवर क्लिक करा.. VIDEO पहा रेल्वे प्रशासनाचे अधिकारी संताेष भिसे काय म्हणाले!

https://youtu.be/hhdux7sUHqM यायला लागतय..कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.