रविवारी देखील धगधग: वनधिकारी मात्र गुमसूम!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
नरक्या तस्करीतील जळून खाक झाली रविवारी ही आग धुमसतच होती.

नरक्याची आग रविवारी धुमसतच होती.
अधिकारी व कर्मचारी फिरकलेच नाहीत.

शिराळा (जी.जी.पाटील)

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जप्त नरक्या वनस्पती आगीच्या भक्षस्थानी पडली.आग लागली की लावली याचा तपास कोकरूड पोलीस करत आहे.पण शनिवारी लागलेली आगीतील नरक्या लाकडाची आग रविवारी ही धुमसतच आहे.असे असतानाही आज वन्यजीव च्या कोणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत.
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नरक्या वनस्पती ची तस्करी वीस वर्षापूर्वी उघड झाली होती. यामध्ये नरक्या व ट्रक ,ट्रॅक्टर, गाढवे जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल हा वन्यजीव कार्यालयाच्या कस्टडीत होता. हा करोडो रुपयांचा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या शेजारील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. तस्करीच्या नरक्याचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व विशेषतः हा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या कस्टडीत असताना ही आग लागल्याने सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे. वन्यजीव विभागाच्या निष्क्रियतेच्या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.त्यामुळे आग लागली की लावली .याची चर्चा परिसरात सुरू आहे.कोट्यावधीचा नरक्या आगीत भस्मसात झाला तरीही वन्यजीव विभागाचे अधिका-याना गांभीर्यच नाही.
अभयारण्यातील आगी चे प्रकरण ताजे असतानाच शनिवार ची नरक्याची आग या कडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत .ते सध्या मार्च अखेर चिरीमिरी गोळा करण्याच्या नादात गुंतले असल्याची चर्चा सुरू असून या ची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी लोकांच्यातून मागणी होत आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान – आगीचे तांडव…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.