मोहरे गावच्या पहिल्या महिला पोलीस पाटील…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गंगाराम पाटील (शिराळा)

सौ. दिपाली कुंभार यांची मोहरे गावच्या पोलीस पाटील पदी निवड

मोहरे (ता.शिराळा) या गावच्या पोलिस पाटील पदी सौ. दिपाली गणेश कुंभार यांची निवड झाली असुन नुकतेच त्यांना उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत नियुक्तीचे पत्र देण्यात आले असुन मोहरे गावच्या पहील्या महिला पोलीस पाटील होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

दरम्यान दिपाली कुंभार यांची मोहरे गावच्या पोलीस पाटील पदी निवड झालेबद्दल यशवंत ग्लुकोज सहकारी कारखान्याचे संचालक मा.एम.एस.कुंभार ,मोहरे गावचे माजी पोलिस पाटील श्री भगवान पाटील व जखिनवाडी गावचे माजी सरपंच- नरेंद्र पाटील,आरळा येथील सांगली बॅंकेचे कर्मचारी- गणेश कुंभार यांचे हस्ते दिपाली कुंभार यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामस्थांनीही शुभेच्छा दिल्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.