WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने

कोल्हापूर – दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मूलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे. विविध विषयांवरील प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी युवा या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या जय भीम… एका महानायकाची गाथा या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य या मालिकेतून उलगडणार आहे. १४ एप्रिल या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या मालिकेला सुरवात झाली. महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख पाहता येणार आहे.

तरुणाईच्या मनातील विषयांना मालिकांमधून मांडण्यासाठी सुरू झालेल्या झी युवा या वाहिनीने आता समाजातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रम व मालिकांमधील वैविध्य, प्रबोधन आणि मनोरंजनाची योग्य सांगड आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती यामध्ये झी युवा वाहिनी नेहमीच अग्रेसर आहे. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा यासाठी झी युवा वाहिनीचा पुढाकार कौतुकास्पद आहे. याच पंक्तीत आता झी युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.

जय भीम … एका महानायकाची गाथा ही १४ एप्रिलला सुरू झालेली मालिका झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी युवानेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उद्धारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारित आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.

झी युवा वाहिनीवर या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या मालिकेची प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता मालिकेत डॉ. आंबेडकर यांची व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार हे पाहण्याची आतुरताही आता शिगेला पोहोचली आहे. यंदा डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली. हा योगायोग साधून झी युवा वाहिनीने महामानवाची गाथा मालिकेतून मांडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करण्याचा संकल्प केला आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.