WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन – काडसिद्धेश्वर महाराज

गगनबावडा येथील आजरीच इको व्हॅलीचे उदघाटन

कोल्हापूर– निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले.गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आजरीज इको व्हॅलीचे उदघाटन स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वामीजी पुढे म्हणाले, देशाच्या सात पर्वतीय रांगांमध्ये सह्यादी पर्वतरांग सर्वांत श्रीमंत आहे. कारण येथील वनस्पती, पक्षी, जंगली प्राणी अशी विपुल प्रमाणात जैवविविधता आहे. त्यामुळे वातावरण संतुलित राहण्यास मदत होते. मन आणि वन नेहमीच सुरक्षित राहायला हवे. मात्र मानवाचा असा समज आहे की, सर्व काही माझ्यासाठीच आहे. त्यामुळे तो सर्वांवर अतिक्रमण करू लागला. सुंदर स्वर्ग तो निर्माण करू शकेल, असे त्याला वाटू लागले आणि त्यातून पंचमहाभूतांच्याही नुकसानीस जबाबदार ठरला.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, येथे उभारलेल्या साखर कारखान्यामुळे आज येथील युवकांना रोजगार मिळाला, तसेच आजरीच इको व्हॅलीच्या माध्यमातून येथील जैवविविधतेचे जतन तर होईलच शिवाय ती समाजासमोर येईल. अशा प्रकारचे आणखी येथे प्रकल्प झाल्यास परिसराचा कायापालट होण्यास वेळ लागणार आहे.

VIDEO पहा —https://youtu.be/N__Tdx0y_4E

शेखर आजरी यांनी प्रास्ताविकात आजरीज इको व्हॅलीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पतीही विपुल प्रमाणात आहेत. त्याच दृष्टीने वेसरफ येथे ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून आजरीज इको व्हॅली, या नावे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले अग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. दहा एकरामध्ये विस्तारलेल्या व इको फ्रेंडली असणाऱ्या या सेंटरमध्ये १५ अडव्हेंचर प्रकार आहेत. पुढे पुढे त्याचा विस्तार करू. येथील आहार हा पूर्ण शाकाहारी असेल. विजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

गगनबावडा येथील वेसरफ येथे मंगळवारी आजरीज इको व्हॅलीचे उदघाटन करताना कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्मामी, डी. वाय. पाटील समूहाचे डॉ. संजय पाटील. शेजारी शेखर आजरी व मान्यवर.

 

डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक रोकडे यांनी आभार मानले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी