टोलवसुलीमध्ये आर्थिक गैरव्यवहार श्वेतपत्रिकेद्वारे वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी – अंबादास दानवे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र…

मुंबई – राज्यातील टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उड्डाणपूलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणीचे पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत सुमारे ५५ उडाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी MEP Infrastructure या कंपनीस सन २०१० पासून मुंबईच्या प्रवेश द्वाराजवळ टोल वसूल करण्यास परवानगी दिलेली आहे. तथापि सदर उड्डाणपूलासाठी झालेल्या खर्चाची वसुली पूर्ण होवूनही सदर कंपनीद्वारे टोलवसुली सुरु आहे. त्याचा नाहक भुर्दंड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसुली पूर्ण होऊन देखील गत काही वर्षापासून टोल वसूली सुरु आहे. टोलवसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपूल यासाठी झालेला खर्च टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.