वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा घेतला श्वास…
| मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. सीमा देव यांनी २४ ऑगस्टला सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच दिवसांपासून वृद्धापकाळाच्या आजाराने त्रस्त होत्या, असे सांगण्यात येत आहे. त्यांना अल्झायमरचा आजारही होता.
मुलगा अभिनयसोबत त्या वांद्रे येथे राहत. सीमा देव यांचा विवाह अभिनेता रमेश देव यांच्याशी झाला होता. रमेश देव यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले. रमेश देव यांचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
|
Views: 255