खासदार श्रीकांत शिंदे यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत
कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार शश्रीकांत शिंदे यांचे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदे यांनी शनिवार पेठेतील शिवालय या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली.
खासदार श्रीकांत शिंदे यांचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार उत्तमरीत्या काम करत आहे कुणाच्या टिकेकर लक्ष देण्याची गरज नाही, आम्ही जनतेची काम करत असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.