शून्यातून विश्वनिर्मितीचं उदाहरण : गिरीश शहा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

उद्योजक गिरीश शहा यांचा आज वाढदिवस…

शून्यातून विश्वनिर्मिती वगैरे वाक्य एकेकाळी पुस्तकी वाटायची, प्रत्यक्षात असं काही घडत असेल हे खरं वाटायचं नाही, पण गिरीशने हे करून दाखवलं. आज त्याची गणना कोल्हापुरातील अग्रगण्य उद्योजकांत होत आहे.

आमचं घराणं मुळचं संपन्न, पण लहान असताना हलाखीची स्थिती झाली. मला स्वतःला शिक्षण घेताना शिकवण्या घ्याव्या लागल्या. लहान वयातच गिरीशला जबाबदारी कळली होती. शिक्षण तसं फारसं नव्हतं. कधी सेल्समन म्हणून, तर कधी दिवाळीत मेणबत्ती, फटाके, साबण याची विक्री कर, असं सुरू होतं. माणसं जोडण्याचा स्वभाव, फुटबॉलची आवड, हाक मारली की येतील असे सवंगडी, यामुळे गिरीशचा व्यवसाय वाढत गेला. दिलबहार तालीम परिसर आणि जैन गल्लीनं गिरीश व माझ्या धडपडीला साथ दिली.

नोकरीपेक्षा व्यवसायात उतरण्याचं धाडस गिरीशने दाखवलं. सुरुवात गिरीश कस्टम हाऊसपासून झाली. नंतर शिवाजी स्टेडियमच्या गाळ्यात सॅमसंगचं शोरूम सुरू केलं. आईच्या नावानं बंगला उभारला. बालपणीच्या आठवणी असलेल्या कॉमर्स कॉलेज समोरील मोडक वाड्याची जागा विकत घेऊन तिथं हॉटेल सिल्व्हर ओक उभारले. मिनरल वॉटरच्या व्यवसायात त्यानं सुरू केलेल्या गुडरीच हे पाणी कुठल्याही बैठकीत समोर येतं. इलेक्ट्रॉनिक वस्तूची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोरूम उभारण्याचे श्रेय गिरीशला जातं. ताराबाई पार्कमध्ये सुरू केलेले क्रिम कॉर्नर ग्राहकप्रिय आहे.

जितोचा अध्यक्ष असलेला गिरीश गरिबी विसरलेला नाही. म्हणूनच समाजोपयोगी उपक्रमांना व नवीन खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देतो. अनेक अडीअडचणी व संकटे आली, पण गिरीशने त्यावर धीरानं मात केली. गिरीशची यशस्वी वाटचाल अशी सुरू राहो ही प्रार्थना!

– प्रा. डॉ. रूपा शहा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.