मतदान ई-प्रतिज्ञा घेणेकरिता लिंक https://evoterpledgekolhapur.com/form.php
मतदार राजा जागा हो, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे मतदान ८०% पेक्षा जास्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून , आपल्या सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी ऑनलाइन ई – प्रतिज्ञा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेबसाईट तयार केलेली आहे. ही ई- प्रतिज्ञा घेणाऱ्या प्रत्येक मतदारास अमोल येडगे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर यांनी स्वाक्षरीत केलेले प्रमाणपत्र ही तात्काळ ऑनलाईन मिळणार आहे. प्रतिज्ञा प्रत्येक मतदाराने घ्यावी यासाठी यासोबत सदर वेबसाईटची लिंक दिलेली आहे. सदर लिंक आपल्या कुटुंबीय मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडे जास्तीत जास्त प्रसारित करावी व त्यांनाही सदर मेसेज व लिंक त्यांच्या परिचितांकडे पाठवण्याची विनंती करावी जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी ई- प्रतिज्ञा घेतली जाईल आणि मतदाना साठी जनजागृती होईल. – श्री.नीलकंठ करे, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर. ▪️Posted by : ︎︎︎︎S M A K
|