भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराला नागरिकांची गर्दी
कल्याण, (आरती परब)- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे. काल श्रीराम टॉकीज, टाटा कॉलनी, आंबेडकर चौक, हनुमान नगर, काटेमानिवली नाका, विजयनगर नाका ते तिसाई हाऊस या मार्गांवर भव्यदिव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता.
या रॅलीला भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा सविता देशमुख, मा. नगरसेवक मनोज राय, विक्रम तरे, महादेव रायभोळे, अनंता पावशे, माजी नगरसेविका सारिका जाधव, हेमलता पावशे, संगीता गायकवाड, माधुरी काळे, मनोज माळी, दीपक गुप्ता, एकनाथ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संतोष केंदळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.