ELECTION:प्रचाराला आले आदेश बांदेकर, कोणाच्या ते वाचा सविस्तर!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांचा डोंबिवलीत प्रचाराचा झंझावात

आदेश बांदेकर यांची विशेष उपस्थिती

डोंबिवली, (आरती परब) – महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांची डोंबिवली शहरामध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. शिवसेना सचिव, सिने अभिनेते होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या विशेष उपस्थितीने महिलांची मोठी गर्दी या रॅलीमध्ये झाली होती.


डोंबिवली आयरे गाव हनुमान मंदिरातून सुरु करण्यात आलेली ही रॅली बालाजी गार्डन, स्वामी विवेकानंद शाळा, अयप्पा मंदिर, मढवी शाळा, ओम बंगला, तुकाराम नगर, सुनील नगर, मारुती महादेव नगर, शांती नगर, जैन मंदिर, मॉडेल शाळा, गांधी नगर, पी अॅण्ड टी कॉलनी, महावीर हॉस्पिटल, सुभाष डेअरी, रामचंद्र नगर, शांताबाई नाका, गोग्रासवाडी आदी भागातून काढण्यात आली.

या रॅलीमध्ये कॉंग्रेस पक्ष प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण लोकसभा समन्वयक संतोष जाधव, संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, उपजिल्हा प्रमुख तात्या माने, जिल्हा युवा अधिकारी प्रतिक पाटील, शहर प्रमुख अभिजित सावंत, शहर संघटिका मंगला सुळे, उप शहर प्रमुख सुधाकर वायकोळे, विभागप्रमुख राहुल भगत, विनायक गोवळकर, शंकर राउळ, रमेश कदम, मंगेश मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी प्रचारामध्ये उमेदवार सुभाष भोईर यांना मिळालेला प्रतिसाद पाहून विजय निश्चित असल्याचे सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.