WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘गोकुळ’मुळे पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला चालना – नितीन गडकरी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ पुरस्कार गोकुळला प्रदान…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग) या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ (बेस्ट डेअरी प्लांट) हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच कार्यक्रमामध्ये गोकुळशी सलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था, पेद्रेवाडी (आजरा) या संस्थेच्या महिला दूध उत्पादक लता उत्तम रेडेकर यांना ‘बेस्ट वुमेन फार्मर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने दुधाचा उत्पादन खर्च कमी करून जनावरांची उत्पादकता वाढविल्याने दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. याचे यशस्वी उदाहरण गोकुळ दूध संघ आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांचे मिळून दिवसाला ५ लाख लिटर पर्यंत संकलन आहे, त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्या गोकुळचे दूध संकलन २० लाख लिटर पर्यंत आहे. हे कौतुकास्पद असून गोकुळमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत झाली आहे. गोकुळ सारखे दुग्ध व्यवसायातील भरीवकाम विदर्भ-मराठवाड्यात झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि गोकुळ परिवारातील सर्वांचेच पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोकुळचा २०२३-२४ सालचा वार्षिक अहवाल दिला. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अहवालाच्या मुखपृष्ठ संकल्पनेचे तसेच गोकुळच्या एकूणच कामगीरीचे भरभरून जाहीर कौतुक करून गोकुळ दूध प्रकल्पास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी-कर्मचारी व सर्व संबधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी आय. सी. ए. आर. चे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्ट, एन. डी. डी. बी. चेअरमन मिनेश शहा, इंडियन डेअरी असोसिएशन अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, महाराष्ट्र पशु व मत्यस विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, डॉ. एस. आर. गडाख, डॉ. इंद्रमनी, डॉ. आर. बी. सिंग, डॉ. प्रशांत कुमार पाटील, आय. डी. ए. (पश्चिम विभाग)चे चेअरमन डॉ. प्रजापती, डॉ. पारेख, डॉ. प्रशांत वासनिक आदी प्रमुख मान्यवरासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिव दमन या राज्यातील दूध संघाचे प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.